• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    मांजरा नदी

    मांजरा नदी

                             मांजरा नदी
    बीड जिल्हयात पाटोदा पठारावरील अंबेजोगाईच्या दक्षिणेकडे मांजरा नदी वाहते आणि नांदेडवरुन पुढे गेल्यावर महाराष्ट्राच्या सीमेवर कोंडलवाडीजवळ उजवीकडून गोदावरीस मांजरा नदी मिळते. या खोज्यात तावरजा, तेरणा, गिरणा, लेंडी, मन्याड या नद्याही वाहतात.

    महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे 616 किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हयाच्या पाठोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड उस्मानाबाद तसे बीड लातूर या जिल्हयांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्हयात प्रवेश करते जिल्हयाच्या मध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात पुढे बौदरच्या पूर्वेस आंध्रप्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशांतील संगरेीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्हयात या नदीवर धरण बाधण्यात आले असून प्रसिध्द निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्हयातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरुन वाहत जाते याच जिल्हयातील कंुडलवाडी गावाजवळ गादावरी नदीस उजवीकडून मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्हयाच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते लेंडी मन्याड या नद्या नांदेड जिल्हयाच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

    No comments:

    Post a Comment