• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    पर्यटन स्थळे



    tourism_banner

    महाराष्ट्र देशाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे.पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र खुप समृध्द आहे,पण पुरेशी राजकीय इच्छाशक्ति नसल्यामुळे आज कित्येक चांगली पर्यटन स्थळे दुर्लक्षिली गेली आहेत.

    महाराष्ट्रातील लेणी तसेच अनेक स्थळांचा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वारसा या यादीत समावेश झाला आहे,ही आपल्या दृष्टीकोनातुन चांगली गोष्ट असली तरी ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करण्यास पुरातत्व खाते कमी पडते आहे.

    याबाबतचे बोलके उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील गडकिल्ले,महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले आहेत ,पण या किल्ल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे,किल्ल्याच्या तटबंदी कोसळलेल्या आहेत,तटबंदीवर झाडेझुडपे वाढली आहेत,किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या वाटा सुरक्षित नाहीत,आज आपण छत्रपतींचे नाव मोठ्या अभिमानाने घेतो,पण छत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष करतो.

    महाराष्ट्र शासनाने पुरातत्व खात्याकडे असलेले सर्व गडकिल्ले ताब्यात घेऊन त्यांचे संरक्षण करणे अत्यंत निकडीचे आहे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवीन ठिकाणांचा शोध घेऊन त्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे,जेणेकरून स्थानिक मराठी तरूणांना रोजगार मिळेल.

    No comments:

    Post a Comment