• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    सांस्कृतिक महाराष्ट्र


    culture_banner
    बहु असोत सुंदर संपन्न की महा 

    प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।

    मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्टकुट, चालुक्य, शिलाहार राजे आणि यादवांच्या कालखंडात महाराष्ट्रात शिल्पकला आणि चित्रकला बहरली कारण या कालखंडात परकीयांचे आक्रमण फार कमी वेळा झाले आहे आणि बहुतेक राजे हे कुणाचे तरी मांडलिक राजे होते,त्यामुळे त्यांना आक्रमणाची भिती कमी होती.

    छत्रपती शिवरायांच्या कालखंडात शेकडो गडकिल्ल्यांची उभारणी झाली. छत्रपतींच्या कालखंडात मोठी मंदिरे,राजवाडे कमी उभारले गेले,याचे कारण म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतातील विविध राजसत्तेकडून वांरवार होणारी आक्रमणे,त्यामुळे कलेसारख्या गोष्टींना मराठयांना वेळ मिळाला नाही.उत्तुंग आणि मोठ्या इमारती बांधण्यासाठी तो काळ अनुकूल नव्हता.महाराष्ट्रातील विविध गडकिल्ले,रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर, राजवाडा,बाजारपेठ आदि वास्तु शिवकालीन स्थापत्याची आठवण करून देतात.

    पण याच कालखंडामध्ये महाराष्ट्रात लोककला बहरली,शाहिरी,लावणीनृत्य, वाघ्यामुरळी आदि लोककला महाराष्ट्रात उदयास आल्या.आज महाराष्ट्रातील विविध लोककला लोप पावत चालल्या आहेत याला कारण म्हणजे शासनाचे लोककलावंताकडे होणारे दुर्लक्ष,शासनाने जर वेळीच या लोककलावंताकडे लक्ष दिले नाही तर या कला नाहीशा होण्यास फार कालावधी लागणार नाही.


           अस्सल महाराष्ट्रीयन माणूस

    No comments:

    Post a Comment