• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?

    व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?





         शिक्षण पद्धतीत आलेले नवीन तंत्रज्ञान

    व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे काय ?

    वाचताना हल्ली VR शब्द बर्‍याच वेळा समोर येतोय. त्यावरून अनेक वाचकांनी VR म्हणजे काय ? असा प्रश्न विचारला आणि याच उत्तर मराठी भाषेत इंटरनेटवर सुद्धा बहुधा सापडणार नाही! म्हणूनच आज आम्ही व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत... 

    व्हर्च्युअल रिअॅलिटी (Virtual Reality VR)म्हणजे आभासी वास्तविकता


    Virtual म्हणजे आभासी: ज्याचा भास होतो की अमुक गोष्ट तिथे आहे पण खरेतर ती नसते!

    Reality म्हणजे वास्तविकता : वास्तव म्हणजे आपण जे पाहतोय आणि त्याच खरच वास्तव्य आजूबाजूला आहे. 

    Virtual Reality म्हणजे वास्तविक जगात आभासी दुनियेचा घेतलेला अनुभव !
    तांत्रिक भाषेत : व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) म्हणजे एक कम्प्युटरवर तयार केलेलं त्रिमिती (3D) वातावरण जे एका व्यक्तिकडून आभासी प्रवासाद्वारे पाहिलं आणि अनुभवलं जाऊ शकतं !

    व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) काम कसे करते? :
                        
                            सध्याचे बहुतांश VR अनुभव हे एका हेडसेटद्वारेच घेतले जातात. हेडसेट हे उपकरण असतं जे आपण डोक्यावर बसवू शकतो आणि आपल्या डोळ्यांसमोर एक स्क्रीन असेल. हे वापरत असताना खर्‍या आयुष्यातील वस्तु शक्यतो दिसत नाहीत(डोळे पूर्ण झाकल्यामुळे). ह्यामध्ये हालचाल टिपणारे, डोक्याची व डोळ्याची स्थिती पाहणारे सेन्सर्स बसवलेले असतात. काही हेडसेटवर आवाजासाठी हेडफोन्सची सुविधा असते.
    आपल्या दोन्ही डोळ्यांना वेगळं चित्र दिसत असतं मात्र मेंदुमध्ये अॅक्चुअल प्रतिमा तयार होताना दोन्ही चित्रं एकत्र होऊन एक प्रतिमा दिसते. त्याचाच वापर करून VR मध्ये तंत्रज्ञान बनवलं जातंय!

    3D चित्रपट आणि VR मधील फरक : 
                 
                                   3D चित्रपटामध्ये केवळ पडद्यावर दिसणार्‍या भागाचाच 3D अनुभव मिळतो मात्र VR मध्ये आपण त्या ठिकाणी उभे आहोत आणि तिथे फिरत, न्याहाळत त्याच्यासोबत इंटरॅक्ट करू शकतो ! व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) शक्यतो कम्प्युटर तंत्रज्ञानानेच बनवलेली असते. आपल्या नजरेच्या टप्प्यात जितकी स्क्रीन दिसते त्यामुळे आपल्याला असा भास होतो की आपण त्या दृश्याचा सर्व भाग पाहत आहोत.


    समजा आपण आपल्या घरी VR हेडसेट घालून बसलो आहोत आणि VR हेडसेटमध्ये मंगळ ग्रहाच वातावरण दाखवलेल असेल तर आपण घरी असूनसुद्धा मंगळावर उभे असल्याचा भास होईल. आपण जर डावीकडे मान वळवली तर मंगळावरचा एक भाग दिसेल. आणि उजवीकडे वळवल्यास दूसरा तसेच मागे व पुढेसुद्धा होईल आणि त्यामुळे आपल्याला अगदी खरोखर तिथे असल्याचा अनुभव येईल! हीच आहे VR ची खासियत !

    VR साठी हल्ली नवे हेडसेट आपल्या स्मार्टफोनचा स्क्रीनसारखा वापर करतात. आपला स्मार्टफोन VR हेडसेटमध्ये ठेवायचा, VR अॅप सुरू करा आणि आभासी दुनियेची सफर करायला व्हा तयार!
    व्हीआरसाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल कार्डबोर्ड, गूगल कार्डबोर्ड हा काही पुठ्ठ्याचे तुकडे, लेन्स जोडून तयार केलेला VR हेडसेट होय. यासाठी केवळ रु. ४००-५०० खर्च येतो ! ह्यामध्ये आपला स्मार्टफोन ठेऊन गूगल कार्डबोर्ड अॅप्लिकेशन सुरू करून लगेच व्हीआर अनुभवता येतं 


    VR Content प्रकार : 
    VR मध्ये आपण खालील प्रकारेचे अनुभव घेऊ शकतो
    पर्यटन स्थळांचा घरबसल्या अनुभव :
    गेम्स : अनेक गेम्स VR साठी योग्य बनवल्या जात आहेत त्यामुळे गेमर्ससाठी VR पर्वणीच ठरणार आहे!
    व्हिडिओ : यामध्ये आपण 360° मध्ये व्हिडिओ पाहू शकतो ! नक्की अनुभव घ्या > Star Wars 360°
    शिक्षण : विद्यार्थी ह्याचा अनुभव वेगवेगळे भाग समजून घेण्यासाठी करू शकतात जसे की इंजिनाचा अंतर्गत भाग, शरीराचे अंतर्गत भाग,इ. 
    खेळ : आपण चक्क क्रिकेटचे सामने मैदानाच्या मध्ये उभारून पाहत असल्याचा अनुभव !
    जंगलात उभे राहून प्राण्यांच्या जवळ फिरण्याचा अनुभवसुद्धा !
    रीयल इस्टेटच्या उद्योगात जागा कधीही दाखवण्यासाठी उपयोग केला जात आहे!
    न्यूज माध्यमे : एखाद्या निदर्शनाचा व्हिडिओ पाहताना त्या निदर्शकांमध्ये उभारून पाहण्याचा अनुभव!
    Concert/कार्यक्रम : अगदी स्टेजवर उभारून कार्यक्रमाचा अनुभव!
    चित्रपट : स्क्रीनवर पाहतानाच चित्रपटगृहात बसून पाहत असल्याचा अनुभव मिळतो! 
    VR व्हिडिओ : व्हर्च्युअल रियालिटी (VR) साठी शूट केलेले व्हिडिओ हे खास कॅमेरा वापरतात. त्यांच्यामध्ये एकाचवेळी 360° अंशात व्हिडिओ टिपण्याची क्षमता असते! बर्‍याच वेळा हे कॅमेरे अनेक कॅमेरे एकत्र बसवून बनवलेले असतात ! म्हणूनच यांना 360° व्हीडिओ सुद्धा म्हणतात. यूट्यूब आणि फेसबुकने या व्हिडिओसाठी खास सोय केली आहे. हे व्हिडिओ कम्प्युटरवर आणि मोबाइलवर सुद्धा पाहता येतात !

    No comments:

    Post a Comment