• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    माझा नाशिक

    •  माझा नाशिक




    • नाशिकचे जागतिकीकरण

    कारखान्यांतून बाहेर पडणारे विविध दूषित वायू व वाहितमल तसेच यंत्रांचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत. कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांसारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अशी दूषित हवा सजीव सृष्टीला अपायकारक ठरते. कारखान्यांतील उत्सर्जित वायू व उष्णता यांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. कारखान्यांतून बाहेर पडणार्‍या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, पिके, ऐतिहासिक वास्तू किंवा शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होतात. उद्योगांमध्ये वापरण्यात येणार्‍या क्लोरोफ्लुओरोकार्बनमुळे उच्च वातावरणस्तरातील ओझोन थराचा क्षय होत आहे. औद्योगिक प्रदूषणांमुळे हरितगृह परिणाम ( सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवरील वातावरणात स्थानबंधन झाल्यामुळे होणारा परिणाम) जाणवू लागले आहेत.कारखान्यांतील वाहितमल नद्या, नाले, सरोवरे, खाड्या, समुद्र इ. जलाशयांत सोडल्याने त्यातील पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाणी मानवी आरोग्यास तसेच परिसंस्थांना अपायकारक ठऱते. गंगा नदीच्या काठावर उभारण्यात आलेले कारखाने व त्यामुळे निर्माण झालेली नागरी केंद्रे यांमुळ गंगा नदीचे पाणी खूप दूषित झाले आहे. जगातील तेलशुद्धीकरण कारखाने प्रामुख्याने समुद्रकिनार्‍यावर स्थापन झालेले







    • नाशिकमधील वाढते प्रदूषण


    मुंबई, पुणे या शहरानंतर आता नाशिकसारख्या झपाटयाने विकसीतत होणा-या शहरालाही प्रदूषणाने वेढले आहे.यात प्रामुख्यांने वाहनांतून निघणा-या धूरामुळे होणारे प्रदूषण आणि गोदावरीचे प्रदूषण आहे प्रदूषणाला रोखण्यासाठी माञ कोणत्याही प्रकारचे भरीव प्रयत्ना होतांना दिसत नाही हे दूदर्वे !
    प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासकीस स्तरावून इको फ्रेंडली असणा-या वेगवेगळया कन्सेपटचा वापर करण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळया योजना आखण्यात याव्या वैयवितक स्‍वच्‍छतेबरोबर सार्वजनिक स्‍वच्‍छतेला महत्वै देणे गरजेचे बनले आहे प्रदूषण कमी करून पर्यावरण संवर्धनाकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे असे मला वाटते स्वयंसेवी संस्था बरोबरोच शासकीय तसेच निमशासकीय स्तरावरून समाजात








    सार्वजनिक अस्‍वच्‍छता प्रदूषणाला हानीकारक


    मला नेहमी एक प्रश्‍न पडतो की माणुस जेवढी व्‍यव्‍तीगत स्‍वच्‍छतेची काळजी घेतो


    त्‍याच्‍या कित्‍येक पटीने सार्वजनिक स्‍वच्‍छता महत्‍वाची असते. परंतु तरीही प्रत्‍येक जण


    त्‍याकडे जाणिव पूर्वक दूर्लक्ष करतांना दिसतात. वाढत्‍या प्रदूषणाला फवत वायूप्रदूषण तसेच


    जल प्रदूषणच जबाबदार नसून त्‍याला मानवनिर्मित सार्वजनिक अस्‍वच्‍छताही तितकीच जबाबदार आहे


    याची सुरूवात ग्रहीणींपासून होते महिला घरातील कचरा घंटागाडीत न टाकता रस्‍त्‍यांच्‍या दूतर्फा टाकतात


    त्‍यामुळे प्रदूषण तर होतेच पण सार्वजनिक आरोग्‍यही धोवयात येते त्‍यामुळे डासांची निर्मिती होउन रोगराइचा

    अस्‍वच्‍छता निर्माण करून प्रदूषण वाढ करणा-यांवर कठोर कार्रवाइ करण्‍यात यावी.

    जलप्रदूषण गोदावरीचे-



    औद्योगीकरण आणि रसायनांमुळेच बहुतेक नद्या प्रदूषित झाल्याचा सर्वसाधारण समज असला, तरी गोदावरी नदीबाबत वास्तव वेगळेच आहे. करोडोंचे पापक्षालन करणाऱ्या गोदामातेचे ८२ टक्‍के जलप्रदूषण तिचा आशीर्वाद व पुण्य घ्यायला येणाऱ्या भाविकांमुळेच होते. औद्योगिक प्रदूषणाचा वाटा फक्‍त १८ टक्‍के आहे. स्वाभाविकच गोदामातेला जीवदान देण्याची जबाबदारीही तिच्यावर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या नाशिककरांवरच येऊन पडते.

    • ध्वनीप्रदूषण



    मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदुषन-ध्वनिप्रदुषनाणे चिडचिड वाढते.रक्तदाब वाढतो.ध्वनिप्रदुषनला कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहे.त्यात सार्वजनिक उसतावांच्या वेळी मोठा आवाज निर्माण होणारे ढोल तसेच सौन्डचा वापर सर्रासपणे केल्याने ध्वनिप्रदुषननिर्माण होऊन जनतेला तसेच जेष्ट माणसाना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जुडतात.याबरोबरच मोटारींचा आवाजही ध्वनिप्रदुषनात भर घालतो.ध्वनिप्रदुषनाला आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्याने त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.




    लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणांपाठोपाठ आता नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी परिसरावर अनेक विकसकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. विविध शिक्षण संस्था, फार्म हाऊस, वॉटर पार्क, रिसॉर्टस, हॉटेल्स या आणि अशा विविध बाबींनी हा परिसर नावारुपाला येत आहे. अंजनेरी हिल्स म्हणून झपाट्याने विकसीत होणाऱ्या या परिसरावर टाकलेला हा फोकस....





    • रिजनल पार्क झोन
    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे हजार हेक्टरचा परिसर राज्य सरकारने रिजनल पार्क झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे याठिकाणी अमर्याद विकास कामांवर निर्बंध आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स, करमणुकीशी निगडीत विविध बाबी यासारख्या बाबींना येथे चालना देण्यात आली आहे. डोंगर, वनराई आणि धार्मिक स्थळांनी बहरलेला हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आता हा परिसर अंजनेरी हिल्स म्हणून नावारुपाला येणार आहे.








    • एज्युकेशन हब

    अंजनेरी परिसरात सध्या संदीप फाऊंडेशन, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली या तीन शिक्षण संस्था कार्यरत आहेत. या तिन्ही संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम नव्याने सुरु होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही संस्थाचा विस्तार प्रस्तावित आहे. आगामी काही वर्षात या ठिकाणी इतरही शिक्षण संस्था येणार आहेत. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था, विखे-पाटील शिक्षण संस्था यांनी या परिसरात जागा घेतली आहे. तर काही संस्था येथे जागेच्या शोधात आहेत. इंटरनॅशनल स्कूल्स, मॅनेजमेंट इंजिनीअरींग, फार्मसी यासारख्या इन्स्टिट्यूटमुळे हा परिसर एज्युकेशन हब म्हणून विकसीत होण्याचा मार्गावर आहे.


    • वेलनेस टुरिझम 
    • ठराविक आजारावर उपचार घेण्यासाठी भारतात, महाराष्ट्रात आणि नाशिक परिसरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. याद्वारेच नाशकात मेडिकल टुरिझम वाढताना दिसत आहे. याच्याच जोडीला आता अंजनेरी परिसर वेलनेस टुरिझमद्वारे नावारुपाला येण्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. आजारी पडूच नये यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध काळजी आणि खबरदारींचे मार्गदर्शन याठिकाणाहून मिळू शकेल. खासकरुन मेडिटेशन, योगा, आयुर्वेद अशा विविध बाबींना वाहिलेल्या संस्था या ठिकाणी सुरु होऊ शकणार आहेत. इगतपुरी येथे विपश्यना केंद्राच्या धर्तीवर असलेल्या या संस्थांमध्ये येणाऱ्यांना धार्मिक पर्यटनही करता येवू शकेल. तसेच, नाशकात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर ताण घालविण्यासाठीचे केंद्रही याठिकाणी साकार होऊ शकतील. ज्या पद्धतीने उरळी कांचन, लोणावळा विकसीत झाले. त्याच धर्तीवर अंजनेरी हिल्स विकसीत होण्याचे संकेत दिले जात आहेत.





    • आयटी हब
    इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आयटी उद्योग हा प्रदूषणविरहीत आहे. त्यामुळे नाशिकताली आयटी उद्योग या परिसरात बहरायला हवा, अशी अपेक्षा बागळगली जात आहे. मोठ्या आयटी कंपन्या त्यांचा उद्योग हिरवाच्छादित ठेवतात. तसेच, प्रदूषण कमी होईल यादृष्टीने तो विकसीत करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या उद्योगांना याठिकाणी चालना देण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील झाले आहेत.





    • फार्म हाऊस
    नाशकातील नामांकीत डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, उद्योजक यांनी अंजनेरी परिसरात ६३ एकर क्षेत्रावर फार्म हाऊसची संकल्पना विकसीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ३० फार्म हाऊस बांधून झाले आहेत. तर इतरांचे काम सुरु आहे. त्यामुळे हे फार्म हाऊस या परिसरात आकर्षणाचा विषय ठरु शकतील.





    • ट्रेकिंग सेंटर
    अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग इन्फॉर्मेशन सेंटर प्रस्तावित आहे. गिरीप्रेमींसाठी हे सेंटर अत्यंत मोलाचे आहे. धाडसी खेळांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच हे सेंटर उभारले जाणार आहे. तीन एकरात उभारण्यात येणाऱ्या या सेंटरला पर्यटन विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सव्वा कोटी रुपये खर्चुन होणाऱ्या या सेंटरद्वारे विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.





    • सायकल ट्रॅक
    नाशिकपासून त्र्यंबकपर्यंत चौपदरी रस्त्याला समांतर सायकल ट्रॅक करण्याचे प्रस्तिवात आहे. यामुळे सायकल आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही सुखद बाब आहे. या ट्रॅकच्या रुपाने या मार्गाचे वेगळेपण दिसतानाच या परिसरातील वैभवात भरच पडणार आहे.





    • व्हल्चर रेस्टॉरंट
    निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अंजनेरी येथील वनविभागाच्या जागेत व्हल्चर रेस्टॉरंट विकसीत करण्यात येणार आहे. साधारण एक एकर जागेवर तारेचे कुंपण घातले जाईल. म्हणजेच ही जागा गिधाडांसाठी राखीव राहील. या जागेत परिसरातील मृत जनावरे टाकण्यात येतील. तत्पुर्वी मृत जनावरांच्या शरीरात डायक्लोफिनॅक औषधाचा अंश आहे की नाही याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाईल. मृत जनावरे हेच गिधाडांचे खाद्य असते. या रेस्टॉरेंटच्या माध्यमातून ते गिधाडांना उपलब्ध होतानाच जनावरांच्या मृतदेहाची योग्यरितीने विल्हेवाट लावण्याचीही सुविधा उपलब्ध होईल. गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने या रेस्टॉरंटद्वारे गिधाडांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण होऊ शकेल.





    • कॉन्झर्वेशन रिझर्व्ह
    अंजनेरीचा परिसर हा आयुर्वेदिक आणि दुर्मिळ वनस्पतींसाठी नावाजलेला आहे. त्यामुळे या वनस्पतींच्या संवर्धनासाठी या भागात २०० एकर क्षेत्रावर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह स्थापण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या अभयारण्यांच्या धर्तीवर असलेल्या रिझर्व्हमुळे दशमुळारिष्ट, टेटू, मूरडशेंग, अश्वगंधा, कळलावी, सालवण, पिटवण, बेल, शिवण, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करताना त्यात वाढ करता येणार आहे. तसेच, राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यास निधी उपलब्ध होऊ शकेल.


    • चौपदरी ग्रीन रस्ता 
    नाशिक ते त्र्यंबक हा साधारण तीस किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. हा रस्ता ग्रीन आयडॉल करण्याचा निश्चय सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या रस्त्याच्या कडेला सध्या असलेल्या शंभर ते सव्वाशे वृक्षांचे पुनर्रोपण आणि सद्यस्थितीत असलेल्या वृक्षांच्या बदल्यात झाडे लावण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड या रस्त्याचे महत्त्व वाढविणार आहे.




    • ब्रह्मगिरी फेरी
    श्रावणात ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविकांसह युवकांची मोठी झुंबड उडते. त्यामुळे श्रावण सोमवारी अंजनेरीचा परिसरही बहरुन जातो. अंजनेरी हिल्स म्हणून हा परिसर विकसीत झाल्यानंतर येथे भाविक आणि युवकांची संख्या आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.


    निसर्ग समृद्धीने नटलेल्या अंजनेरी परिसराचे महत्त्व मोठे आहे. प्रचंड क्षमता असूनही हा भाग तसा दुर्लक्षितच राहिला आहे. मात्र, आता हा परिसर अंजनेरी हिल्स म्हणून नावारुपाला आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. -शशी जाधव, संचालक, शुभम वॉटर पार्क


    नाशिक लगत असलेला अंजनेरी परिसर ग्रीन थीमद्वारे विकसीत होत आहे. याठिकाणी होणारा प्रत्येक प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करीत आहेत. त्यामुळे या परिसराचे हिरवी समृद्धी कायम राहणार आहे. तसेच, या परिसरात येत्या काळात वेलनेस आणि होली टुरिझमलाही चालना मिळेल

    • पर्यटन





    भारतातील अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक येथे सिंहस्थ पर्वात भरणार्‍या कुंभमेळ्यामध्ये गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी श्रद्धाळू भाविक प्रचंड संख्येने गर्दी करतात. नाशिक जिल्ह्यात साजर्‍या होणार्‍या धार्मिक उत्सवांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व भव्य धार्मिक उत्सव! हा उत्सव १२ वर्षांनी एकदा साजरा होतो. नाशिक कुंभमेळ्याला धार्मिक मेळाव्यांमध्ये सर्वात पवित्र मेळावा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. हा केवळ जिल्ह्यापुरता उत्सव नसून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेला उत्सव आहे.


    राक्षसांपासून अमृततीर्थाचे रक्षण करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर १२ दिवस वास्तव्य करून होते. देवतांचे १२ दिवस म्हणजे मानवाची १२ वर्षे, आणि म्हणूनच सिंहस्थ कुंभमेळा १२ वर्षांनी साजरा केला जातो. ह्या अमृततीर्थाचे चार थेंब ज्या ठिकाणी पडले होते, अशा चार ठिकाणी हा मेळा भरतो. या मेळ्यात लाखोंनी भक्त सहभागी होतात.


    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता, ते काळाराम मंदिर नाशिक येथेच असून येथील नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन ही स्थळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. येथून जवळच असलेली पांडव लेणीही प्रसिद्ध आहेत.


    नाशिक-मुंबई रस्त्यावर नव्याने निर्माण करण्यात आलेले बुध्द विहार बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान आहे.


    त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगम स्थान व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे हे ठिकाण असून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्योतिर्लिंगावर ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांच्या प्रतिमा हे येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे.हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून उत्कृष्ट शिल्प व स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.


    सप्तशृंग गड: कळवण तालुक्यातील वणी येथे देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध्या पीठाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजले जाते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत म्हणून या स्थानाचे नाव सप्तशृंग! हा गड १४१६ मी. उंच असून येथील परिसर अत्यंत रमणीय आहे.


    जिल्ह्यातील मालेगाव हे शहर मोसम नदीच्या किनार्‍यावर वसले असून पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला येथे आहे.


    येवला येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला. तात्या टोपेंसारख्या स्वातंत्र्यसेनानीचे हे जन्मगाव होय. याशिवाय भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान नाशिक तालुक्यात आहे. नांदूर-मध्मेश्वर हे गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले अभयारण्य ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाते. (भरतपूर हे राजस्थानमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे.) १०,००० हेक्टरवर पसरलेल्या ह्या अभयारण्यात पक्ष्यांच्या २२० प्रजाती, वनस्पतींच्या ४०० प्रजाती व माश्यांच्या २४ प्रजाती आढळतात.





    सिन्नर येथे श्री गोंदेश्वराचे प्राचीन हेमाडपंती देवालय आहे. तसेच येथील भैरवनाथ मंदिरात प्रचंड गणेशमूर्ती आहे. येथे देवीची बारा मंदिरे आहेत. याशिवाय येथे भारतातील पहिले खाजगी विमानतळही आहे. उपरोक्त स्थानांबरोबरच नाशिक तालुक्यातील म्हसरुळ येथील जैन लेणी, सीमेवरील सापुतार्‍याचे जंगल, सोमेश्र्वर येथील दुग्धस्थळी धबधबा, चांदवड येथील किल्ला ही इतर पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत.




    • ऐतिहासिक पार्श्वभूमी





    नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.






    नाशिक शहर गोदावरी नदी काठी वसलेले असून, या ठिकाणी पेशव्यांची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी नाशिक शहरात घात,मंदिरे उभारून नाशिक शहराला आकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.त्यात पेशव्यांच्या सरदारांनी बांधलेले श्रीकाळाराम मंदिर हे जगप्रसिद्ध आहे तसेच नुकतेच पी.के. चित्रपटाचे चित्रीकरण याठिकाणी झाले.तसेच याच मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. पंचवटी परिसरात नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर,तपोवन, नाशिक रोड येथे मुक्तिधाम हि स्थळे आहेत. तसेच दर बारा वर्षांनी रामकुंडावर सिंहस्थ महाकुंभमेळा या ठिकाणी भरतो.

    शहरा जवळच आनंदवल्ली हे ठिकाण आहे.या गावचे मूळ नाव चावड. या गावात राघोबादादांनी त्यांची पत्नी आनंदीबाई हिच्यासाठी राजवाडा बांधला होता.तसेच यागावचे नावहि आनंदवल्ली ठेवले.









    नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी हे गाव आहे. हे गाव इतिहासप्रसिद्ध तर आहेच, परंतु हनुमानाचा जन्म या अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याची आख्यायिका असल्याने येथे हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. इ.स.७२० मधील दोन ताम्रपट व तेराव्या शतकातील दोन ताम्रपट या गावात सापडल्याने या गावाचे महत्व अधिकच स्पष्ट झाले. त्याकाळची राजधानी म्हणून अंजनेरी हे होते.



    नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी व संशोधन संस्था,महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. एकलहरे या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे,तर भगूर हे गाव स्वांतत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.



    त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच परिसरात कुशावर्त तीर्थ असून, येथेही बारा वर्षांनी नाशिकबरोबरच शैव पंथीय साधू-महंताचा कुंभमेळा भरतो. येथे असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरातून गोदावरीचा उगम झालाय. याच गावात निवृत्तीनाथांनी समाधी घेतली असून, दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.











    चांदवड हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे लोकमता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे निवासस्थान होते. येथे ११व्या शतकातील जैन लेणी आहेत. होळकरांचा भव्य वाडा आणि वाड्यातील रंगीत चित्रे पाहाण्यासारखी आहेत. चांदवडमधील रेणुकादेवीचे मंदिर प्रसिध्द आहे.



    कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनीचे मंदिर आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक म्हणून हे स्थान प्रसिध्द आहे इगतपुरी येथील विपश्यना केंद्र प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही हे प्रसिध्द आहे.


    नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.








    नाशिक तपोभूमी आणि कर्मभूमी














    प्रभू श्रीरामचन्द्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे “नाशिक” १४ वर्षाच्या वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीतामाता गोदाकाठी पंचवटी पर्णकुटीमध्ये त्यांनी निवास केला होता. पृथ्वीतालावरील हिंदू धर्मियांचा सर्वाधिक पवित्र शहरात नाशिकचे सर्वोच्च स्थान आहे.कारण येथे होणारा “सिंहस्थ कुंभमेळा “ प्रत्येक बारा वर्षानंतर एकदा नाशिक य शहरात भरतो . जेंव्हा सुर्य सिंह राशीत प्रवेश करतो.










    भारतभर दशक्रियेसाठी काशी आणि नाशिकचे महत्व अहंमान्य आहे. त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगपैकी नाशिकपासून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथूनच उगम पावणारी गोदावरी नदी य ठिकाणी आहे.तसेच य नदीला दक्षिणगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. व रामकुंड हे पवित्र तीर्थ या नदीवर आहे. येथे असलेले शंकर भगवानाचे मंदिर असून त्या मंदिरात शंकर भगवानाचे वाहन नंदी या मंदिरात नसून असे एकमेव मंदिर आपल्या भारतात म्हणजे नाशिक या शहरात आहे.



    एकीकडे तपोभूमीचे सामर्थ्य पाहता नाशिकचे तांत्रिकदृष्ट्या प्रगती विसरून चालणार नाही.भारतातील चलनी नोटांचा कारखाना [ नोट प्रेस ] नाशिक शहरात आहे. तसेच शहरापासून वीस किलोमीटर अंतर असलेले ओझर या ठिकाणी लढाऊ विमान कारखाना [H.A.L], तसेच भारतातील क्रमांक एक व आशिया खंडातील क्रमांक दोनचा सर्वाधिक ५.०३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल नाशिक शहरातून जातो.





    जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आपल्या नाशिक शहराचा १६वा क्रमांक लागतो. शहराची लोकसंख्या २०लखाहुन अधिक आहे. हि लोकसंख्या २७० कि.मी. अंतराच्या परिघात वसलेली आहे. शहरातून जाणारा सहापदरी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग [N.H.] क्रं.०३ आता एशियाटिक हायवे नं.४७ हि बनला आहे. तसेच ओझर येथे विमानतळ प्रकल्प चालू आहे. गंगापूर धरणावर होणारा [fiying sea plane ]प्रकल्पाचे काम करण्याचे सरकार प्रयत्न सरकार करत आहे. अंबड,सातपूर आणि सिन्नर येथिल माळेगाव सारख्या MIDC नाशिकच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे .





    भारताचे वाईन राजधानी म्हणून आपल्या नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.७५ वाईनरी नाशिक शहरात आहे म्हणूनच नाशिक शहराला जगाच्या नकाशावर वेगळे स्थान निर्माण प्राप्त झाले. उत्तम प्रतीचे द्राक्ष निर्यात करणारे शहर आहे. बारमाही थंड तापमान नाशिकमध्ये आल्हादायी असते. जून महिन्यापासून डिसें-जानेवारी पर्यंत पंधराहून अधिक गडकिल्ले भटकंतीला जसे जनी खुणावतात.





    हिंदू प्रमाणेच मुस्लीम , ख्रिश्चन ,शीख इ. धर्मांचे लोक व त्यांची संस्कृती आपल्याला य शहरात दिसून येते. हे सर्व धर्मीय एकोप्याने वावरताना दिसतात तसेच एकमेकांच्या सणावारात आनंदाने सहभागी होताना आढळतील.


    • इतिहास नाशिकचा



























    • नाशिक शहराची ओळख
    महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे.सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्र , नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते.गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा हॅल्ही' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे.
    अनुक्रमणिका


    इतिहास


    इतिहासाचा कालखंड


    आधुनिक काळाचा इतिहास


    सिहास्थ कुंभ मेळा


    हवामान


    अर्थकारण


    शिक्षण


    विद्यालय


    अभियांत्रिकी महाविद्यालय


    वैद्यकीय महाविद्यालय


    धार्मिक स्थळे


    मनोरंजन


    नाट्यगृह


    चित्रपट गृह


    आकाशवाणी केंद्र


    खरेदी


    वाहतुकीचे केंद्र


    बसस्थानके


    रेल्वेस्थानके


    विमानतळे


    प्रसिद्ध व्यक्ती

    इतिहास


    पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे.रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.[१] महाकवी कालिदासभवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.[२] मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नीसीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.


    भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत.इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.
    ऐतिहासिक कालखंड


    मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले मोगलांचे सुरत बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणाऱ्या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.


    पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता.'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
    आधुनिक काळातील इतिहास


    भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून यास्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास दुष्ट ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.


    भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
    • सिंहस्थ कुंभ मेळा
    हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी व चवथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद,हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.


    नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखो-करोडोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली.
    • हवामान
    पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४६.७° से. नोंदले गेले. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान ०.६° से. नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे.
    • अर्थकारण
    महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आह.


    शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महिंद्र अँड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑयल इंजन, अमेरिकन टुरीजम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे इंडियन करन्सी प्रेस हा नोटांचा छापखाना, तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस पासपोर्ट व स्टॅम्प छपाई होते. नाशिकहे वाईन साठी प्रसिध्द असलेले शहर आहे. इथे भरपूर वाईन कंपनी आहे. त्या प्रसिध्द सुलावाईन , योकवाईन , विंचूरावाईन इत्यादी आहे.
     

    • शिक्षण


    • प्राथमिक व विशेष शिक्षण:-


    नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ हे विद्यापीठे आहेत.


    • विद्यालये

    पेठे विद्यालय
    मराठा विद्यालय
    आदर्श विद्यालय
    बिटको विद्यालय
    रुंगठा विद्यालय
    भोसला मिलिटरी स्कूल
    गुरु गोविंदसिंह स्कूल

    • महाविद्यालये

    BYK कॉमर्स कॉलेज. (भिकुसा यमासा क्षत्रिय)
    RYK सायन्स कॉलेज. (रावजिसा यमासा क्षत्रिय)
    HPT आर्टस कॉलेज. (हंसराज प्रागजी ठाकरसी)
    N.D.M.V.P. कॉलेज (नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज)
    KTHM कॉलेज (K.R.T.आर्टस, B.H.कॉमर्स & A.M. सायन्स कॉलेज)
    पंचवटी कॉलेज (महात्मा गांधी महाविद्यालय )
    बिटको कॉलेज ( नाशिक सिटी )
    बिटको कॉलेज ( नाशिक रोड )
    G.D. सावंत कॉलेज
    भोसला मिलिटरी कॉलेज
    गुरु गोविंदसिंह कॉलेज

    • अभियांत्रिकी महाविद्यालये



    K.K.वाघ इंजिनियरिंग कॉलेज

    (कर्मवीर काकासाहेब वाघ)
    शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
    G.N. सपकाळ इंजिनियरिंग कॉलेज


    (गंभीरराव नातुबा सपकाळ)
    MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग
    N.D.M.V.P. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
    K.V.N. NAIKकॉलेज ऑफ इंजिनि




    • धार्मिक स्थळे


    रामाचे काळ्या पाषाणात बनवलेले प्राचीन मंदिर


    सोमेश्वर येथील प्रसिद्ध धबधबा


    गोदावरी नदीवरील प्रसिद्ध राम कुंड


    नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम


    त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.


    निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.


    अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.


    सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.


    नारोशंकर घंटा ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)


    गंगाघाट, पंचवटी


    राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


    सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.


    काळा राम मंदिर - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर


    सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे,


    सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.


    कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)


    एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी


    मुक्तिधाम (नाशिक रोड)


    भक्तिधाम (पेठ नाका)


    नवश्या गणपती


    इच्छामणी गणपती (उपनगर )


    आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य


    कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत


    विल्होळी जैन मंदिर


    रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदीचा गणपती)


    वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.


    चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.


    पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.


    फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.


    सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एकबालाजी मंदिर आहे.


    खंडबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.


    राशेज किल्ला


    नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.


    सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.


    कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.


    नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य.


    अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली.
     


    • मनोरंजन
    • नाट्यगृहे



    • चित्रपट गृहे


    फेम सिनेमा, पुणे-नाशिक रस्ता, नाशिक


    हेमलता रविवार पेठ


    सिनेमॅक्स कॉलेज रोड


    सिनेमॅक्स - रेजिमेंटल (नाशिक रोड)


    सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल


    दामोदर भद्रकाली


    विजयानंद भद्रकाली


    सर्कल - विकास अशोकस्तंभ


    मधुकर मेन रोड


    दिव्या बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)


    महालक्ष्मी (दिंडोरी रोड)


    चित्रमंदिर मेन रोड


    अशोक (मालेगाव स्टँड, पंचवटी)


    अनुराधा (नाशिक रोड)


    आयनॉक्स (उदयोन्मुख)
     
    • आकाशवाणी केंद्रे
    सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.


    ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्. एम्.


    रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.


    रेड एफएम (रेडीओ) ९३.५ एफ्. एम्.


    रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.




    • खरेदी

    मेन रोड,शालीमार व शिवाजी रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.


    कॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.


    नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिद्ध आहे.


    चांदीच्या दागिन्यांसाठीही शहर प्रसिद्ध आहे


    नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल उत्तर महाराष्ट्र सर्वात मोठा मॉल म्हणून प्रसिद्ध आहे.
     



    • वाहतुकीचे पर्याय
    हेसुद्धा पाहा: नाशिकचे सार्वजनिक परिवहन
    ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या बस
    राज्य परिवहन महामंडळाच्या बस
    लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे कल्याणते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
    २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.
    बसस्थानके
    '''मध्यवर्ती बस स्थानक''' (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.
    महामार्ग बस स्थानक: मुंबई, शिर्डीअहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या बस या स्थानकावरून सुटतात.
    '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निमाराम बस व पुष्कळ सामान्य बस उपलब्ध आहेत.
    नाशिक रोड बस स्थानक : हे बसस्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणाऱ्या-या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाद्वारे सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणाऱ्या काही बस येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
    मेळा बस स्थानक
    रेल्वेस्थानके
    नाशिक रोड
    देवळाली कँप.
    विमानतळ
    नाशिकच्या मध्यावर्ती गांधीनगर जवळ हे विमानतळ आहे.
    नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर ओझरला H.A.L.चे विमानतळ आहे.

    • प्रसिद्ध व्यक्ती
    दादासाहेब फाळके
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
    कवी गोविंद - स्वातंत्र्य शाहीर (दरेकर)
    कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) ज्ञानपीठ विजेते आणि मराठी साहित्यातील आढळ तारा.
    वीर बापू गायधनी
    आर. डी. कर्पेकर
    वसंत कानेटकर
    अनंत कान्हेरे
    दादासाहेब पोतनीस (गावकरी)
    दादासाहेब गायकवाड


    वामनदादा कर्डक ( लोककवी)
    गाडगेबाबा ( समाजसुधारक)

    1 comment: