• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    पांझरा नदी

    पांझरा नदी 



    पांझरा नदी



                                                              पांझरा नदी

    धुळे जिल्हयातील तापीची उपनदी, लांबी सु. 160 किमी. हिचा उगम जिल्हयाच्या नैऋत्य कोपज्यात, सहयाद्रीतील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरुन डावीकडील धानोज्याचे डोंगर उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते. ही पूर्ववाहिनी नदी धुळे शहरापासून पुढे 8 किमी. अंतर पूर्वेकडेच वाहत जाते. त्यानंतर तिच्या मार्गात आलेल्या भित्तिप्रस्तराला फोडून ती एका अरुंद दरीतून एकदम उत्तरेकडे वळसा घेते. नंतर थाळनेरपासून सु. 8 किमी. अंतरावर असलेल्या मुडावद येथे ती तापी नदीस मिळते. नदीच्या पूर्वप्रवाहाच्या भागात तिच्या डाव्या तीराला समांतर पसरलेल्या लांबट आकाराच्या अनेक डोंगररांगा आढळतात. पांझरा नदीपासून वर्षभर पाणीपुरवठा होत असून, अनेक ठिकाणी प्रवाहाचे पाणी अडवून स्ंाचिनाच्या सोयी केल्या आहेत. मुख्यत: साक्री, धुळे आणि श्ंादिखेडा या तालुक्यातील जमिनीस जलस्ंाचिनाचा फायदा झाला आहे. तापी-पांझरा संगमाजवळ महाशिवरात्रीस यात्रा भरते.

    No comments:

    Post a Comment