• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री क्षेत्र,देहू



    संत तुकारामांचा जन्म भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( इ.स. १६०९ )साली देहू येथे झाला,त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.तुकारामांच्या घरचा परंपरागत व्यवसाय हा सावकारीचा होता. इ.स.१६३१ सालच्या कालखंडामध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी सर्व खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त केले.

    संत तुकारामांनी आपल्या अभंगातून समाजातील विषमतेवर आसूड ओढले.देहूतील धर्मपंडितांनी त्यांना खूप त्रास दिला पण शेवटी त्यांना तुकारामांचे देवपण मान्य करावे लागले.इ.स.१६५०,देहूमध्ये त्यांचे वैकुंठगमन झाले.देहूमध्ये वृंदावन,विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत.तुकारामबीजेला म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे मोठा उत्सव असतो.पूण्यापासून जवळच देहू हे तीर्थस्थान आहे.आषाढ महिन्यातील एकादशीला देहूहून पंढरपूरला संत तुकारामांची पालखी निघते.
    संत तुकारामांची पालखी,देहू

    No comments:

    Post a Comment