• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    फिरंगोजी नरसाळा


    शाहित्येखानाने स्वराज्यावर आक्रमण केल्यावर पुण्यात लालमहालात मुक्काम ठोकला.शाहित्येखानाच्या फौजा संग्रामदुर्गावर(चाकणचा भूईकोट किल्ला)चालून गेल्या.संग्रामदुर्गाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होता.फिरंगोजी महापराक्रमी वीर होता.

    किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती.मुघलांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला.पण किल्ला काही दाद देत नव्हता.मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते.अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवसलढविला.मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला.किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.

    मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले.कारण महाराज म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा.माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.'फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.
    संग्रामगड,फिरंगोजीच्या पराक्रमाचा साक्षीदार
    संग्रामगड,फिरंगोजीच्या पराक्रमाचा साक्षीदार
     

    No comments:

    Post a Comment