• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    आबाजी महादेव

    कल्याणचा सुभेदार आबाजी महादेव

    कल्याणचा विजापुरच्या दरबाराचा खजिना लुटण्याचा छत्रपती शिवरायांनी बेत आखला.छत्रपती शिवराय स्वत:या मोहिमेवर रवाना झाले.छत्रपतींच्या अगोदर आणखी एक मावळ्यांची तुकडी कल्याणच्या वाटेवर पोहचली होती.या तुकडीचे नेतृत्व करत होते आबाजी महादेव,त्यांच्यासोबत दादाजी कृष्ण,सखो कृष्ण लोकरे या मोहिमेत सामील झाले होते.विजापुरकरांचा खजिना ज्या वाटेने जाणार होता.त्या वाटेवरील जंगलात सर्व मावळे लपून बसले.

    कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमंद हा कल्याणचा गोळा केलेला खजिना घेऊन आपल्या घोडदळासोबत विजापुरच्या वाटेला होता.त्याचा मुलगा आघाडीवर राहून सोबतच्या शिबंदीस सुचना देत होता.चढण,उतरण,चिखलरस्ता पार करत ते जंगलाच्या वाटेला लागले.अचानक हर हर महादेव ची रणगर्जना करत आबाजीच्या तुकडीने सुभेदारावर हल्ला केला.अचानक हल्ला झाल्यामुळे बेसावध असलेल्या अदिलशाही सैन्याची दाणादाण उडाली व सर्व खजिना मराठ्यांच्या हाती लागला.

    खजिना घेऊन आबाजीच्या तुकडीने कल्याणवर चाल केली व कल्याण मराठ्यांच्या घोड्याच्या टापाखाली आले.कल्याणच्या नगारखान्यावर भगवा डोलाने फडकू लागला.कल्याणपाठोपाठ आबाजीच्या तुकडीने भिवंडीवर हल्ला करून भिंवडीला ही मराठ्यांच्या घोड्याच्या टापाखाली आणले.कल्याणच्या दिशेने येत असलेल्या राजेंना ही बातमी कळाली,राजे आनंदले.महाराजांसमोर कल्याणची लुट पेश करण्यात आली.आबाजींचा पराक्रम पाहून राजे बेहद खुश झाले व आबाजींस कल्याण प्रांताची सुभेदारी बहाल केली.

    No comments:

    Post a Comment