• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    बाजी जेधे



    कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले.

    शहाजीराजें त्यांना बोलिले,"मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)

    शहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले, "महाराजांनी (शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ."(जेधे करीना)

    याच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,"यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू)तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही."यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.
    जेधे यांचे रोहिडा किल्ल्यावरील वाड्यातील देवघर
    कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले,"अफजलखान बेईमान आहे.कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे मर्‍हाष्ट राज्य आहे.अवघियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री..स्वामी सांनिध राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या."यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले.अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली.

    प्रतापगडाच्या लढाईत कान्होंजीचा पुत्र बाजी याने जीव महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचविले तर खानाचा पाडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकार्‍यांसोबत खानाच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशादी, खजाना मिळविला.शिवाजीराजेंनी सन १६५५-५६ साली जावळीच्या मोर्‍यांस शासन केले,त्यावेळी कान्होजी,बांदल,सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.

    शाहित्येखानाविरूध्द लढण्यासाठी बाजी व चंदाजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेंसोबत लालमहालात गेले होते.राजें तोरणा,राजगडच्या बांधणीत गुंतले असताना,विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला.राजे तातडीने कान्होजीस पुरंदर किल्ल्यावर आले.मराठ्यांचे गनिमाबरोबर धारोंधर युध्द जाहाले,अनेक मावळे मृत्युमुखी पडले,पराभव झाल्यास मराठ्यांचा ध्वज शत्रुच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनास धाडून ध्वज घेऊन पुरंदरावर आला.तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणोन खूष जाहाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला.पुढे बाजी,सर्जेराव या नावाने ओळखू लागला.

    पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले.स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.

    No comments:

    Post a Comment