• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    हिरोजी फर्जंद



    सन ११ जून १६६५ च्या तहानुसार छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्यास रवाना झाले.औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसा राजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले.पण औरंगजेबने दरबारात राजेंचा अपमान केला,तसेच त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलादखानाचे पहारे बसविले.स्वत:छत्रपती शिवराय,युवराज संभाजीराजे कैदेत अडकल्यामुळे स्वराज्यावर मोठे संकट उभे राहिले होते.

    छत्रपती शिवरायांनी आपल्या चतुराईने संभाजीराजेंना मोघलांची मनसबदारी मिळवून दिली त्यामुळे संभाजीराजे मुक्तपणे संचार करू शकत होते,तसेच हिरोजी व मदारी म्हेतर यांस राजेंनी आपल्या सोबत ठेवून आपल्या सोबतच्या इतर मावळ्यांना बाहेर पाठविले.संभाजीराजेंना मनसबदारी मिळाल्यामुळे त्यांनी राजेंच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले.संभाजीराजेंनी मावळ्यांना आग्र्याच्या बाहेर ठिकठिकाणी तैनात ठेवले.छत्रपती शिवरायांनी आजारी पडण्याची युक्ती करून आपली तब्येत चांगली व्हावी म्हणून आग्र्यातील मंदिर,मशिदी,गोरगरिब जनतेला मिठाईचे पेटारे पाठवयास सुरूवात केली.सुरूवातीस पोलादखानाचे सैन्य पेटारे काळजीपणे तपासत होते पण नंतर ते पेटारे तपासण्यास कुचराई करू लागले.अखेरीस संधी साधून दि १७ ऑगस्ट १६६६ ला राजें वेशांतर करून पेटारे घेऊन निघून गेले(राजें आग्र्यातून कसे निसटले याबद्दल इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत).राजेंच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद छत्रपतींचे कपडे घालून झोपला.या घटनेच्या वर्णन सभासदाच्या बखरीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

    हिरोजी फर्जंद पलंगावरी निजला होता.तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात,तो राजे शेला पांघरून निजलेले.पोर पाय रगडित होता.पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले?पोर म्हणतो की,'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात.तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता.तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन,आपली पांघरूणे,चोळणा,मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन,बाहेर आला चौकीदारास पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते,कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मना करणे.आपण औषध घेऊन येतो.म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले.रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरिला.

    No comments:

    Post a Comment