• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    कुणकेश्वर



    कुणकेश्वर मंदिर प्राचीन असून यादवकालीन आहे.छत्रपती शिवरायांनी नीळकंठ बावडेकरांकरवी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.जांभ्या खडकावरील शिवलिंगावर काळ्या पाषाणाची शाळुंखा आहे.मंदिराच्या सागरतटाकडील भागाकडे भक्कम बांधीव तट घातला आहे.मंदिराचा कळस भव्य असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

    मंदिर परिसरातील समुद्रकिनारी एकवीस शिवलिंगे आढळतात. कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारी ही शिवलिंगे अजूनही सुस्थितित आहेत. ही शिवलिंगे पांडवानी घडविलेली आहेत असे म्हणतात.कुणकेश्वर मंदिराच्या जवळ काही प्राचीन लेणी आढळतात.मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या देवगडहुन अवघ्या १८ किमी.अंतरावर कुणकेश्वर आहे.
    kunkeshwar

    No comments:

    Post a Comment