• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री जोतिबा,कोल्हापूर


    श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं !

    समुद्रसपाटीपासून अंदाजे ३१०० फूट उंचीवर दख्खनचा राजा श्री जोतिबा विसावला आहे.डोंगरावरील वाडी रत्नागिरीचे नावाचे गावठाण आहे.श्री जोतिबा हे बद्रिकेदारचे रूप आहे.

    श्री जोतिबाचे मुळ मंदिर छोटे होते.इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे शिंदे यांनी ते पुर्नचित करून भव्य स्वरूपात बांधले.जोतिबाचे मुळ मंदिर हेमाडपंती शैलीतील असून,या ठिकाणी आणखी तीन मंदिरे आहेत.मुख्य मंदिर हे प्राचीन असून त्याचे बांधकाम शिलाहार राजाच्या कालखंडात झालेले असावे.उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे.

    मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतिच्या बेसाल्ट दगडात केलेले आहे त्यामुळे मंदिरातील तापमान संतुलित राहते.मंदिरासमोर दोन नंदी आहेत.चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत जोतिबा डोंगरावर सासनकाठी लवाजम्यासह असतात.यात्रेत गुलाल-खोबरे यांची पालखीवर उधळण केली जाते.जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस सतरा कि.मी.अंतरावर आहे.
    दख्खनचा राजा श्री जोतिबा

    No comments:

    Post a Comment