• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    नीरा नदी

    नीरा नदी
                                                               
     नीरा नदी


         भीमा हया उपनदीची उजवीकडील महत्वाची उपनदी. ही पुणे जिल्हयाच्या भोर तालुक्यात, सहयाद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पुर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्व वाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्हयाची दक्षिण सीमा बनते. सातारा जिल्हयातील खंडाळा फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे 160 किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्हयाच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरस्ंागिपुरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे. पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे. नीरा नदी मुख्यत: जलस्ंाचिनासाठी उपयुक्त आहे.

    No comments:

    Post a Comment