• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    लोककला

    वासूदेव

    वासुदेवाचा उल्लेख आठशे वर्षापुर्वीच्या महानुभव पंथातील साहित्यामध्ये आहे. पहाटेच्या प्रसन्न अशा वेळी वातावरणात गाणे म्हणत वासुदेवाची स्वारी येते.डोक्यावर मोरपिसांनी सजविलेला मुकूट,अंगातील शुभ्र झब्बा,कमरेला बांधलेलं रंगीत उपरणं.उपरण्यात खोवलेली बासरी.हातात टाळ-चिपळ्या असा वासुदेवचा पोशाख असतो.

    कुणी दान दिलं तर तो घेतो नाहीतर पुढच्या दारी जातो.कृष्णाची भक्ती वासुदेव करतात.लोकांना आवडतील अशा चालीत तो गवळण,ओव्या,अभंग गातो.लोकांना उपदेश करतांना तो सर्वांना समजण्यासाठी तो गोड भाषेचा वापर करतो.वासुदेवाचे उपदेश साधे सरळ सोपे पण काळजाला भिडणारे असतात.
    vasudev
    बहूरूपी

    बहुरूप्याच्या उल्लेख श्रीपती भट यांच्या 'ज्योतिषरत्नमाला' या आद्यग्रंथात,'बोहपी' या नावाने आलेला आहे.तर संत एकनाथांच्या काव्यरचनेत याचा उल्लेख आलेला आहे.ग्रामीण भागातील जनतेला कामातून सुटका करून आपल्या विनोदाने हसविणारा बहुरूपी खरोखरच एक अवलिया आहे.कष्ट करून थकलेली जनता दुपारी घटकाभर आराम करत असते अशावेळी हा विविध सोंगे घेऊन येतो व थकलेल्या जीवाला हसवितो.

    कधी तो राजकारणी लोकांचे सोंग घेतो तर कधी तो पोलीसाचे सोंग घेतो,कधी तो भटजी बनून येतो .त्याचा वेश ही पात्राला साजेसा असा असतो.हसून आपल्या कामाचा थकवा घालविलेले लोक मग त्याला धान्य,कपडे अथवा पैश्याची मदत करतात.
    bahurupi
    गोंधळी

    सर्वसाधारणपणे लग्न,मुंज किंवा इतर शुभकार्याच्या वेळी घरी गोंधळ घालावयाची प्रथा आहे.गोंधळी लोक जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे तसेच माहूर हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात.

    अगदी प्राचीन कालापासून इ.स.१००० पूर्वी गोंधळाची प्रथा आहे.श्री तुळजाभवानीला,श्री महालक्ष्मीला गोंधळ घालावयाची प्रथा कर्नाटकातील कदंब राजघराणे तसेच कोल्हापूरातील शिलाहार राजघराण्यात होती.प्रारंभी गणेशाला नमन करून गोंधळाची सुरूवात होते.नंतर गोंधळासाठी सर्व देवदेवताना आवातणं दिलं जातं.
    gondhal
    शाहिरी

    शाहिरीला खुप प्राचीन परंपरा आहे.यादव राजा रामदेवराय कालखंडापासून शाहिरी किंवा पोवाड्यांची परंपरा आहे.शाहिरी मध्ये वीररस ओथंबून भरलेला असतो.

    गुलामगिरी विरूध्द आवाज उठवून लोकांच्या अंगी स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्याचे मुख्य काम शाहिरांनी यादव कालखंडापासून शिवकालापर्यंत केले.पराक्रमाचे पोवाडे गावागावात सादर करून लोकांना युध्दभूमिवरील प्रत्यक्ष वर्णने ऐकवून त्यांच्यामध्ये जागृती घडविली.उदा.पावनखिंडीमधील लढाई, तानाजीचा पोवाडा आदि.
    powada
    भारूड

    संत एकनाथांना भारूडाचे जनक म्हटले जाते.भारूड अध्यात्माचा प्रसार करण्याचे भारूड हे महत्वाचे असे साधन आहे.ग्रामीण बोलीभाषेचा वापर करून लोकांचे प्रश्न मांडून त्यांचे मनोरंजन करणे हा भारूडाचा मोठा गुणधर्म आहे.

    भारूडातून नाट्य,वक्तृत्व आणि संगीताच्या यांचा सुंदर मिलाफ घडतो.संत एकनाथांची,'दार उघड बये दार उघड, दादला नको ग बाई, विंचू चावला अशी भारूडे खूप लोकप्रिय आहेत.'
    vittal_umap

    तमाशा

    तमाशाचा उदय पेशवाईच्या कालात झाला असे म्हटले जाते.पेशवाईच्या कालात या कलेला राजाश्रय लाभला.गण,गौळण,लावण्या,भेदिक कवने,मुजरा ही पेशवेकालीन तमाशाची अंगे होती.

    पेशवेकालात होनाजी बाळा,अनंत फंदी,रामजोशी यासारखे शाहिर होऊन गेले.तमाशात वगनाट्याचा प्रकार एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आला.वगनाटय प्रामुख्याने ग्रामीण भागात लोकप्रिय आहे.
    tamasha

    No comments:

    Post a Comment