• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    अष्टविनायक


    १.मोरगांव

    अष्टविनायक यात्रेची सुरूवात मोरगांव पासून करतात.गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या मंदिराची स्थापना केली होती.मोरगाव हे पुण्यापासून अंदाजे ७० कि.मी.अंतरावर आहे.मंदिराचे बांधकाम दगडी असून ठिकठिकाणी नक्षीकाम केलेले आहे.श्री मोरेश्वराची मूर्ती अत्यंत देखणी असून मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.बारामती पासून अंदाजे ३५ ते ४० कि.मी.तसेच जेजुरीपासून १५ ते २० कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

    २.थेऊर

    अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी हा होय.माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा विस्तार केला.डाव्या बाजुला सोंड असलेला गणेश भक्तांच्या चिंतेचे हरण करतो म्हणून या गणपतीला,श्री चिंतामणी म्हणतात.माधवराव पेशवे तसेच त्यांच्या पत्नी रमाबाई यांची समाधी थेऊरलाच आहे.थेऊर पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून हे ३० कि.मी.अंतरावर आहे.

    ३.सिद्धटेक

    अष्टविनायक यात्रेतील तिसरा गणपती हा सिद्धटेकचा आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.भीमा नदीवर वसलेले हे सिद्धिविनायकाचे स्वयंभू मंदिर मोठे प्रशस्त आहे.मंदिरात पितळी मखर असून सभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे.दौंडपासून सिद्धटेक चे अंतर अंदाजे ९९ कि.मी.आहे.

    ४.रांजणगाव

    अष्टविनायक यात्रेतील चौथा गणपती रांजणगावचा श्री महागणपती हा होय.गणेशाची मुर्ती अत्यंत प्राचीन असून ती इ.स.१० व्या शतकातील आहे.अतिशय सुंदर रूप असलेल्या श्री गणेशाला दहा हात आहेत.श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन विराजमान आहे.अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे.माधवराव पेशवे तसेच इंदूरचे सरदार किबे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला असल्याचा उल्लेख आहे.पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात रांजणगाव हे श्री महागणपती ठिकाण आहे.

    ५.ओझर

    अष्टविनायक यात्रेतील पाचवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर हा होय.भक्तांच्या विघ्नांचे हरण करतो,म्हणून या गणपतीला श्री विघ्नेश्वर असेही म्हणतात.श्री विघ्नेश्वर गणेशाच्या मुर्तीच्या डोळ्यात माणिक असून,कपाळावर हिरा आहे.मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम आहे.चिमाजी अप्पांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा पुरावा इतिहासात आहे.ओझर हे ठिकाण पुण्यापासून ८५ कि.मी.अंतरावर आहे तर लेण्याद्रीपासून १४ कि.मी.वर आहे.

    ६.लेण्याद्री

    अष्टविनायक यात्रेतील सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा होय.मंदिराच्या परिसरात भरपूर लेणी आढळतात.मंदिर उंचावर असून,मंदिरात जाण्यासाठी अंदाजे चारशे पायर्‍या आहेत.मंदिरात दगडामध्ये कोरलेली श्री गणेशाची प्रसन्न व सुंदर मूर्ती आहे.पुण्यापासून सुमारे ९७ कि.मी.अंतरावर हे ठिकाण आहे.

    ७.महड

    अष्टविनायक यात्रेतील सातवा गणपती महडचा श्री वरदविनायक हा होय.श्री वरदविनायक मंदिर अत्यंत साधे,कौलारू असून मंदिराच्या घुमटाला सोनेरी कळस आहे.पेशव्यांच्या कालखंडात या मंदिराची स्थापना झाली आहे.पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोलीच्या जवळ हे ठिकाण आहे.

    ८.पाली

    अष्टविनायक यात्रेतील आठवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर हा होय.स्वयंभू स्थान असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. मंदिरात चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली प्रचंड घंटा आहे.पालीपासून जवळच सुधागड,सुधागड हे किल्ले आहेत.पाली हे ठिकाण पुण्यापासून ११० कि.मी.अंतरावर तर खोपोली पासून ४० कि.मी आहे.
    थेऊरचा श्री चिंतामणी
     

    No comments:

    Post a Comment