• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    जैन तीर्थक्षेत्रे

    महाराष्ट्रातील काही महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

    श्री मांगीतुंगी तीर्थ 
    श्री मांगीतुंगी तीर्थक्षेत्र हे ताहाराबाद गावापासून अंदाजे दहा किलोमीटर अंतरावर आहे.सदर तीर्थक्षेत्रात आदिश्‍वर भगवानाची अर्धपदमासनस्थ भव्य मूर्ती आहे. या पर्वताची दोन शिखरे मांगी व तुंगी या नावाची असल्यामुळे "मांगी-तुंगी तीर्थ' असे नाव त्यास पडले असावे. 

    श्री गंजपंथा तीर्थ 
    हे प्राचीन तीर्थस्थान नाशिक शहरापासून अंदाजे सात किलोमीटरवर असलेल्या म्हसरूळ गावाच्या पर्वतावर आहे. या तीर्थस्थानात भगवान पार्श्‍वनाथांची श्‍याम वर्णात अर्धपदमासनस्थ भव्य सुंदर मूर्ती आहे. 

    श्री अंतरिक्ष पार्श्‍वनाथ तीर्थ 
    वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावात आहे.विक्रम संवत 1142 मध्ये श्री अंतरिक्ष पार्श्‍वनाथ भगवानाचे पदमासनाथ मूर्ती प्रकट झाली. ही प्रतिमा रावण राजाचे मेहुणे श्री राजारवरदूषण द्वारा निर्मित आहे. 

    श्री रामटेक तीर्थ 
    नागपूरहून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. सदर ठिकाणी शांतिनाथ भगवान यांची सुवर्ण वर्णात 14 फूट उंच प्रतिमा आहे. 

    श्री भद्रावती तीर्थ 
    चंद्रपूरपासून  अंदाजे   बत्तीस   किलोमीटरवर भांदक गावात आहे.अतिप्राचीन असे हे जैन तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थात स्वप्नदेव श्री केशरिया पार्श्‍वनाथांची श्‍याम वर्णाची अर्धपदमासनस्थ भव्य मूर्ती आहे. 

    श्री बाहुबली तीर्थ 
    हातकलंगले गावाजवळ हे सुंदर रमणीय तीर्थस्थान आहे. भगवान बाहुबली यांची कायोत्सर्ग मुद्रेत सत्तावीस फूट उंचीची  मूर्ती तेथे विराजमान आहे. 

    श्री कुंभोजगिरी तीर्थ 
    कोल्हापूरच्या जवळ असणाऱ्या हातकलंगले गावापासून अंदाजे आठ किलोमीटरवर, श्री कुभोजगिरी तीर्थक्षेत्र आहे.तेथे श्री जगवल्लभ पार्श्‍वनाथ भगवानाची श्‍वेत वर्ण पदमासनस्थ भव्य मूर्ती आहे. सन 1926 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. 

    श्री दहिगाव तीर्थ 
    पंढरपूरहून 65 किलोमीटर तर  साताऱ्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे.सदर ठिकाणी श्री महावीर स्वामींची श्‍याम वर्ण पदमासनस्थ मूर्ती आहे. 

    श्री आगाशी तीर्थ 
    मुंबईच्या विरार स्टेशनपासून श्री आगाशी तीर्थक्षेत्र आहे,श्री मुनिसुव्रत स्वामी यांचे नीलवर्ण पदमासनस्थ रूपात भव्य मूर्ती आहे. सदर तीर्थक्षेत्राच्या प्राचीनतेचा इतिहास श्री श्रीपाल राजाच्या नवपद आराधनेशी संबंधित आहे. 

    वळसाणा तीर्थ 
    धुळे जिल्ह्यातील साक्री जवळ वळसाणा येथे भव्य जैन मंदिर आहे.
    bahubali
     

    No comments:

    Post a Comment