• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    जीवबा महाला



    जीवबा महाला यांचे संपुर्ण नाव जीवा महाला संकपाळ.महाबळेश्वराच्या पायथ्याशी असलेले कोंडवळी हे त्यांचे गाव होय.जातीने जीवा न्हावी होते.प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी छत्रपती शिवरायांचे ते अंगरक्षक होते.

    सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.इतक्यांत सैदबंडा पटाईत धावला.त्यानें राजे जवळ केले.पट्याचे वार राजियावरि चालविले.तो राजियांने जिऊ महालिया जवळील आपला हुद्दियाचा पट्टा घेऊन,पट्टा व विचवा असे कातर करून सैदबंडा याचे चार वार ओढले.पांचवे हाताने राजियास मारावें तो इतकियांत जिऊ महाला याणे फिरंगेनें खांद्यावरि सैदबंडियासि वार केला.तो पट्टियाचा हात हत्यारा समेत तोडिला.आणि खानाचे शीर घेऊन राजे सिताब गडावरि जिऊ महाला व संभाजी कावजी महालदार असे गेले.

    यावरून 'होता जिवा,वाचला शिवा' ही उक्ती झाली.पुढे हुकूमाची अवज्ञा केल्याबद्दल छत्रपतींनी जीवा महालास दुर केले.सन १७०९ साली जीवा महाला मरण पावला.
    जीवा महाला यांची रोहिडा किल्ल्यावरील समाधी
    जीवा महाला यांची रोहिडा किल्ल्यावरील समाधी

    No comments:

    Post a Comment