• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    छत्रपतींची वंशावळ

    छत्रपती शिवाजी महाराज राजपूत सिसोदिया कुळाचे होत.काही इतिहासकारांच्या मते चितोडच्या भोसाजीराणा या राजाच्या नावावरून या कुळाला भोसवंत अर्थात भोसले हे नाव मिळाले.तर काही इतिहासकारांच्या मते हजार वर्षापूर्वी दक्षिणेकडील राजांना भोज ही संज्ञा होती या भोजसंज्ञक राजाचे वंशज ते भोसले होय.मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता.पुत्र झाल्यावर त्या पिराची नावे शहाजी व शरीफजी आपल्या पुत्रास ठेवली.शहाजीराजेंचे थोरले पुत्र संभाजीराजे लढाईत मारले गेले,तर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे मराठ्यांचे राज्य स्थापन केले.बेंगलोर हे मराठ्यांचे कर्नाटकातील मुख्य ठिकाण होते.पण शहाजीराजेंच्या मृत्युनंतर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे राज्य हलविल्यामुळे मराठ्यांचे खुप मोठे नुकसान झाले.

    gotavala_shivaji

    No comments:

    Post a Comment