• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री समर्थ रामदासस्वामी

    श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (जि.जालना) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस झाला.त्यांनी बारा वर्ष दीर्घ तपश्चर्या केल.प्रभू श्रीराम,तुळजाभवानी आणि मारुती ची त्यांनी उपासना केली.या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला.त्यासमयी समर्थ २४ वर्षाचे होते.पुढील १२ वर्षे त्यांनी भारत-भ्रमण केले.याच काळात त्यांची पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी भेट झाली.सदर कालखंडात त्यांनी विविध शास्त्रांचा अभ्यास केला.

       
    मुळ नाव :नारायण सूर्याजी ठोसर
     
    वडील :सूर्याजी ठोसर
     
    आई :राणूबाई ठोसर
    साहित्यरचना:दासबोध,आत्माराम,मनाचे श्लोक,करुणाष्टके,अनेक स्फुट रचना

    तीर्थक्षेत्रे: सज्जनगड,शिवथर घळ
     
       ramdas  


    शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली.त्यानंतर त्यांनी निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली.त्यांच्या 'जय जय रघुवीर समर्थ’या गर्जनेने लोकांच्या धार्मिक भावना जागृत केल्या.हरिकथा निरूपण,सावधपण,राजकारण व साक्षेप तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला.समर्थांचे दासबोध,मनाचे श्लोक,करुणाष्टके,भीमरूपी स्तोत्र,'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची'ही गणपतीची आरती,तर 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती प्रसिध्द आहे.ध्यानी मनी राम असणाऱ्या व स्वत:ला रामाचा दास म्हणवणाऱ्या रामदासांनी,रामाविषयी अनेक अभंग लिहिले.

    ध्यान करु जाता मन हरपले

    ध्यान करु जाता मन हरपले ।
    सगूण ते झाले गुणातीत ॥१॥

    जेथे पाहे तेथे राघवाचे ध्यान ।
    करी चापबाण शोभतसे ॥२॥

    राम माझे मनी राम माझे ध्यानी
    शोभे सिंव्हासनी राम माझा ॥३॥

    रामदास म्हणे विश्रांती मागणे
    जीवीचे सांगणे हीतगूज ॥४॥
    समर्थ रामदासनी स्थापना केलेले अकरा मारुती पुढील प्रमाणे आहेत. (१) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) उंब्रज मारुती (ता. कराड) (६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसुर मारुती (ता. कराड) (८) बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि. कोल्हापूर).समर्थ रामदासांचे काही अभंग पुढीलप्रमाणे आहेत.


    श्रीमारुतिस्तोत्र
    भीमरुपी महारुद्रा , वज्रहनुमान मारुति
    वनारी अंजनीसूता , रामदूता प्रभंजना ॥

    महाबळी प्राणदाता , सकंळा उठवी बळें ।
    सोख्यकारी दःखहारी , दुत वैश्ण्वगायका ॥

    दीननाथा हरीरुपा , सुंदरा जगदंतरा ।
    पातालदेवताहंता,भव्यसिंदुरलेपन ॥

    लोकनाथा जगन्नाथा , प्राणनाथा , पुरातना ।
    पुण्यवंता,पुण्यशीला , पावना परितोशका ॥

    ध्वजांगे उचली बाहो , आवेशें लोट्ला पुढे ।
    काळाग्नी , काळरुद्राग्नी , देखतां कांपती भयें ॥

    ब्रम्हांडे माइली नेणों, आंवळें दंतपंगती ।
    नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा , भुरकुटी,ताठिल्या- बळें ॥

    पुछ तें मुरडिलें माथां , किरीटी कुंड्लें बरीं ।
    सुवर्णकटिकासोटी,घंटा किंकिणि नागरा ॥

    ठकारे पर्वताऐसा, नेट्का सडपातळू ।
    चपळांग पाहतां मोठे , महाविध्युल्लतेपरी ॥

    कोटिच्या कोटि उड्डाणें , ज़्हेपावें उत्तरेकडे ।
    मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥

    आणिला मागुती नेला , आला गेला मनोगतीं ।
    मनासी टाकिलें मागें , गतीसी तुळणा नसे ॥

    अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
    मंद्राद्रीसारीखा द्रोणु, क्रोधें उत्पाटिला बळे ॥

    आणिला मागुती नेला , आला गेला मनोगतीं ।
    मनासी टाकिलें मागें , गतीसी तुळणा नसे ॥

    अणुपासोनी ब्र्म्हांडायेवढा होत जातसे ।
    तयासी तुळणा कोठें , मेरुमांदार धाकुटे ॥

    ब्रम्हांडाभोंवतें वेढे , वज्रपुछए करुं शके ।
    तयासी तुळणा कैंची , ब्रम्हांडीं पाहतां नसे ॥

    आरक्त देखिलें डोळा , ग्रासिलें सुर्यमंड्ळा।
    वाढ्ता वाढता वाढे , भेदिलें शुन्यमंडळा ॥

    धनधान्य पशुवृध्दि,पुत्रपौत्र समग्रही ।
    पावती परुपविद्यादि , स्तोत्रपाठें करुऐयां ॥

    भूतप्रेतसमंधादि , रोगव्याधि समस्तहि ।
    नासती तुटती चिंता , आनंदे भीमदर्शनें ।

    हे ध्ररा पंधरा श्लोकी ,लाभली शोभली बरी
    दृढदेहो निसंदेहो सैख्या चंद्रकळागुणें ॥

    रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू ।
    रामरुपी अंतरात्मा , दर्शनें दोश नासती ॥

    ।। इति श्रीरामदासकृत संकटनिवारसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णं ॥

    No comments:

    Post a Comment