• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    रामजी पांगेरा

    रामजी पांगेरा शिवरायांचा पराक्रमी मावळा

    प्रतापगडाच्या युध्दात(दि.१० नोव्हेंबर १६५९)रामजी पांगेराने पराक्रम करून जावळीच्या जंगलात खानाच्या सैन्याची कत्तल केली होती.रामजी हा छत्रपतींचा मावळातील सहकारी होता.याचे जन्मस्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.नाशिक भागातील कण्हेरा किल्ल्याजवळ रामजी आपल्या सातशे सहकार्‍यांसह तळ ठोकून होते.कारण मोघलांच्या फौजा कधी स्वराज्यावर चालून येतील याचा काही नेम नव्हता.

    सन १६७१ साली दिलेरखान बर्‍हाणपुराहून सुमारे तीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला.नाशिक भागातील कण्हेरा किल्ला जिंकण्यासाठी तो चालून निघाला.ही बातमी कण्हेरा किल्ल्याजवळील रामजीस समजली.तीस हजाराच्या सैन्यापुढे सातशे मावळ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते.रामजीने आपल्या मावळ्यांना एकत्र केले व त्यांना स्वराज्यासाठी लढावयास प्रवृत केले.मावळे हर हर महादेव चा गजर करत चवताळून उठले.कण्हेरा किल्ल्याच्या आश्रयास न जाता ते दिलेरखानाच्या फौजेची वाट पाहू लागले,जणू त्यांच्यात भवानीच संचारली होती.

    दिलेरखान कण्हेरा गडाजवळ आल्याबरोबर दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी त्याच्यावर हल्ला केला.हर हर महादेव चा गजर करत मावळे तुटून पडले,दोन्ही हाताने तलवार चालवत रामजी शत्रूवर तुटून पडले.मावळे हट्टास पेटले होते,अखेरीस मोघली सैन्य पळत सुटले.मराठ्यांच्या आक्रमणापुढे दिलेरखानास माघार घ्यावी लागली.कण्हेरा किल्याच्या परिसरात सातशे मावळ्यांनी तीस हजार गनिमांचा पराभव केला व पराक्रमी रामजी इतिहासात कायमचा अमर झाला.

    No comments:

    Post a Comment