• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    छत्रपती शहाजीराजे

    ।। छत्रपती शहाजीराजे भोसले।।

    वेरूळच्या मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांनी पुत्र व्हावा म्हणून अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस केला होता.त्यामुळे पुत्र झाल्यावर शहाजी व शरीफजी अशी आपल्या पुत्रांची नावे त्यांनी ठेवली.शहाजीराजेंचा जन्म इ.स.१८ मार्च,१५९४ रोजी झाला.

    शहाजीराजेंचे पिता मालोजीराजे भोसले निजामशाहच्या चाकरीत होते. निजामशाहच्या दरबारात सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव हे सुध्दा चाकरीत होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.पुढे निजामशाहच्या पुढाकाराने शहाजीराजेंचा विवाह,लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी जिजाबाई यांच्याशी इ.स.१६०३ मध्ये झाला.शहाजीराजें व जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये झाली.त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजेंचा सांभाळ जिजाबाईंनी केला.

    सासरे लखुजी जाधव यांच्याशी बेबनाव 
    मालोजीराजेंच्या दुदैवी मृत्यूनंतर शहाजीराजेंनी आपल्या पराक्रमाने निजामशाहच्या दरबारात मानाचे स्थान पटकावले.पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला,कारण होते पिसाळलेल्या हत्तीस काबूत करण्याचे.निजामशाहच्या दरबारातील एक हत्ती पिसाळला होता,हत्तीस पकडण्यास दोन पथके तयार केली गेली.पहिले पथक जाधवांचे होते,त्याचे नेतॄत्व लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ दत्ताजीराव जाधव करत होता.तर दुसरे पथक भोसले यांचे होते.त्याचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराजे भोसले करत होते.यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
    छत्रपती शहाजीराजे भोसले
    स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले 

    निजामशाहीचा स्वतंत्र कारभार

    दिल्लीश्वर शहाजहान व महंमद अदिलशाह यांच्या संयुक्त फौजांनी निजामशाही संपवण्यासाठी आक्रमण केले.अहमदनगरजवळील भातवढीच्या रणांगणात शहाजीराजेंनी वजीर मलीक अंबरच्या मदतीने मोघल व अदिलशाहच्या फौजेचा पराभव केला हा ऐतिहासिक युध्द इ.स १६२४ मध्ये झाले.पण या लढाईत शहाजीराजेंचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.

    शहाजीराजेंनी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला.अहमदनगर जिल्ह्यातील,संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर त्यांनी निजामशाहच्या मुलाच्या नावाने छत्र धारण केले होते.त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता.पण पुढे वजीर मलिक अंबरच्या निजामशहाच्या दरबारातील वागणूकीमुळे त्यांनी अदिलशाहची चाकरी पत्करली.शहाजीराजेंना अदिलशाहने सरलष्कर हा किताब दिला तसेच त्यांना बंगळूरची जहागिरीही दिली.अदिलशाहच्या चाकरीत असताना शहाजीराजेंनी पुणे परगणा निजामशाहकडून जिंकून घेतला.बंगळूरमध्ये त्यांनी तुकाबाईशी दुसरा विवाह केला.तुकाबाईपासून त्यांना व्यंकोजी(एकोजी)हा पुत्र जाहला.


    बंगळूरमध्ये असताना स्वराज्याच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आपले धाकटे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे परगण्यात स्वतंत्र कारभार करण्यासाठी पाठविले.राजेंसोबत त्यांनी कान्होजी जेधे,रांझेकर,हणमंते आदि विश्वासू मावळ्यांना पाठविले.छत्रपती शिवरायांना त्यांनी राज्यकारभारासाठीची आवश्यक असणारी राजमुद्राही दिली.
    अदिलशाहीत दगा व सुटका
    पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राजकारभार चालू केल्यानंतर अदिलशाहचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने दगा करून बाजी घोरपडे, मंबाजी बोसले,बाळाजी हैबतराव,बाजी पवार आदिच्या साहाय्याने शहाजीराजेंना जिंजीजवळ कैद केले व साखळदंडानी बांधून विजापुरच्या दरबारात हजर केले.तो दिवस होता इ.स.२५ जुलै १६४८.छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांनी मुत्सदीपणाने मोघल बादशाह शहाजहानला पत्र पाठवून आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीश्वराची चाकरी करू इच्छितात असे सांगितले व बदल्यात शहाजीराजेंची सुटका करण्यासाठी विजापुरच्या अदिलशाहवर दबाव आणावा असे सांगितले.हा मुत्सद्दीपणा यशस्वी ठरला व शहाजीराजांची दि.१६ मे,इ.स.१६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

    शहाजीराजेंचा दुदैवी मृत्यु
    इ.स.१६६१-इ.स.१६६२ च्या कालावधीत शहाजीराजे महाराष्ट्रात आले.महाराष्ट्रात आल्यावर आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले.पण पुढे ते आपल्या जहागिरीमध्ये परतले.माघ शुध्द ५,इ.स.२३ जानेवारी १६६४ मध्ये बंगळूर जवळील होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा पाय वृक्षवेलीमध्ये अडकला व ते घोड्यासहीत खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    स्वतंत्र मराठा साम्राज्याचा संकल्प पुर्ण
    शहाजीराजेंच्या निजामशाह,मोघल व अदिलशाह यांच्याकडे चाकरी केली पण ते आपला स्वाभिमान कधीच विसरले नाहीत.स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्रात धाडिले,सोबत विश्वासू लोक पाठविले.बंगळूरमध्ये असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लष्करी तसेच मुलकी शिक्षण दिले.पुढे स्वराज्य स्थापनेचे त्यांचा संकल्प त्यांचे थोरले पुत्र छत्रपती शिवाजी राजेंनी पुर्ण केला व त्यांनी एक विशाल मराठी राज्य निर्माण केले.तर धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांनी तामीळनाडूतील तंजावर येथे दुसरे स्वतंत्र मराठी राज्य निर्माण केले.
    होदेगिरीच्या जंगलातील छत्रपती शहाजीराजे भोसले यांची समाधी
    shahaji_samadhi



    No comments:

    Post a Comment