• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री क्षेत्र,आळंदी


    संत ज्ञानेश्वराचां जन्म (इ.स. १२७५)साली आळंदी येथे झाला.सर्वसामान्य लोकांना भगवद् गीता समजण्यासाठी त्यांनी संस्कृतमधून मराठीमध्ये भावार्थदीपिका या नावाने तिचे भाषांतर केले.ज्ञानेश्वरी या नावाने ते प्रसिद्ध आहे.सदर महान कार्य त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.याशिवाय त्यांनी 'अमृतानुभव'आणि 'चांगदेवपासष्टी' हे ग्रंथ व अनेक अभंगगाथा आपल्या अल्प अशा कालावधीमध्ये लिहिल्या.

    आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे.संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर सोळाव्या शतकात बांधले गेले आहे,असे सांगितले जाते.आळंदीमध्ये मुक्ताई मंदिर,कृष्ण मंदिर,राम मंदिर,स्वामी हरिहरेंद्र मठ तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर पाहण्यासारखे आहे.आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी निघते.पालखीत लाखो लोक सहभागी होतात.पूण्यापासून जवळच आळंदी हे तीर्थस्थान आहे.
    संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर,आळंदी
     

    No comments:

    Post a Comment