• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    दुसरा बाजीराव जीवनक्रम

    दुसरा बाजीराव पेशवे(पळपुटा) यांचा जीवनक्रम(मराठेशाहीच्या अस्तंगतास कारणीभूत ठरलेला पेशवा) ;
    पुण्यावर ज्यावेळी आक्रमण झाले त्यावेळी बाजीराव पुण्याबाहेर पळाला होता त्यामुळे त्याला पळपुटा बाजीराव असेही म्हटले जाते.सन 1818 साली इंग्रजानी जेव्हा पुण्यावर हल्ला करून पुणे जिंकले त्यावेळी बाजीराव पुण्यातून पळाला ,सहा महिन्याच्या पाठलागानंतर इंग्रजांनी त्याला पकडले.त्यास उत्तर प्रदेशातील बिठूर येथे ठेवण्यात आले.दरसाल आठ लाख तनखा त्यास इंग्रजाकडून मिळू लागला.बिठूरमध्ये आलिशान राजवाडा बांधून ,जनानाखाना बाळगून बाजीराव राजेशाही थाटाने जगला .33 वर्ष बिठूर येथे राहून तो तेथेच मरण पावला.दुसऱ्या बाजीरावाचा कालखंड हे मराठ्यांच्या इतिहासातील काळे पर्व आहे.
    साल
    तारीख महिना
    ठळक घटना
    1775

    धार येथे बाजीरावाचा जन्म
    1783
    डिसेंबर 11
    रघूनाथरावांचा कोपरगाव येथे मृत्यु
    1795
    ऑक्टोबर 27
    सवाई माधवरावांचा शनिवारवाड्यात अपघाती मृत्यु
    1796
    डिसेंबर
    बाजीरावांना पेशवेपद
    1797
    डिसेंबर
    नाना फडणवीस यांना बाजीरावकडून कैद
    1799
    मे 4
    टिपू सुलतानाचा मृत्यु
    1800
    मार्च
    नाना फडणवीस यांचा पुण्यात मृत्यु
    1800
    ऑक्टोबर
    इंग्रजाकडून निजाम मांडलिक
    1801
    डिसेंबर
    विठोजी होळकर यांची बाजीराव कडून हत्तीच्या पायी देऊन हत्या
    1802
    ऑक्टोबर
    यशवंतराव होळकरांचा पुण्यावर हल्ला,बाजीरावाचे पुण्यातून पलायन
    1802
    डिसेंबर
    बाजीराव व इंग्रज यांच्यात वसईचा तह
    1803
    मे
    बाजीरावांना इंग्रजाकडून पेशवेपद बहाल
    1803
    जूलै
    इंग्रजाकडून बडोदेकर गायकवाड मांडलिक
    1805

    यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्यात तह
    1811
    ऑक्टोबर 27
    यशवंतराव होळकरांचा मृत्यु
    1817
    नोव्हेंबर
    इंग्रजाचे पुण्यावर आक्रमण,बाजीरावाचे परत पुण्यातून पलायन
    1818
    एप्रिल 10
    छ.प्रतापसिंहाना सातारा येथे इंग्रजांनी गादीवर बसविले
    1839
    सप्टेंबर 4
    छ.आप्पासाहेब यांना साताऱ्याची गादी इंग्रजाकडून बहाल
    1847
    ऑक्टोबर 17
    प्रतापसिंहाचा मृत्यु
    1848
    एप्रिल,5
    छ.आप्पासाहेब यांचा मृत्यु सातारा गादी खालसा(मराठा साम्राज्याची अखेर)
     

    No comments:

    Post a Comment