• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    नृत्यप्रकार

    लावणीनृत्य

    महाराष्ट्राचा वैशिष्ट्यपूर्ण असा हा लावणीप्रकार आहे.पेशवाईच्या कालावधीत लावणीनृत्य बहरले कारण पेशव्यांनी लावणीला राजाश्रय दिला.रामजोशी,होनाजी बाळा,प्रभाकर आदि प्रतिभावंत शाहिर पेशवाईच्या कालखंडात उदयास आले.

    पठ्ठे बापूरावांच्या कालात सवाल-जवाब हा लावणीप्रकार उदयास आला. लावणीनृत्यामध्ये मुख्य नर्तिके व्यतिरिक्त आणखी काही नर्तिका असतात. ढोलकी,सुरपेटी,तुणतूणे ही वाद्ये लावणीनृत्याची रंगत वाढवतात.शिवाय सोगांड्या अधूनमधुन विनोद करून प्रेक्षकांची करमणूक करतो.
    lavani1
    आदिवासी नृत्य

    महाराष्ट्रात आदिवासी लोक विविध ठिकाणी विखूरले आहेत.आदिवासी नृत्यामध्ये भिल्ल,कातकरी,गोंड,संथाळ,ठाकूर लोकांचे नृत्य विशेष प्रसिध्द आहे.शिमगा सण म्हणजे भिल्ल लोकांचा मोठा उत्सव असतो.या कालात स्त्री-पुरूष दोघेही बेभान होऊन नृत्य करतात.

    कातकरी लोकांत 'झेंडा' नावाचे नृत्य प्रसिध्द आहे. देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी कातकरी लोक नृत्य करतात. तसेच गोंड,संथाळ,ठाकूर आदि लोकांच्या नृत्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.पारंपारिक पोशाख आणि वाद्ये ही आदिवासी नृत्याची वैशिष्ट्ये आहेत.
    adivasi_dance
    कोळीनृत्य

    कोकणातील कोळी लोकांचे पारंपारिक नृत्य महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.कोळी जमातीचे लोक समुदायाने नृत्य करतात.

    बेभान समुद्रकिनारा, गळ्यामध्ये शिंपलाच्या माळा आर्कषक पेहराव,धुंद आणणारे संगीत या वातावरणात कोळी नृत्य अधिक बहरत जाते.
    koli_dance
    धनगर नृत्य

    महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरच्या धनगरांच्या नृत्याला गजानृत्य असे म्हटले जाते. ढोल,झांज आणि बासुरी ही वाद्ये तसेच नृत्यात उधळला जाणारा पिवळा भंडारा यामुळे वातावरण भारून निघते.

    लग्नप्रसंगी केल्या जाणार्‍या नृत्यास गुगुळनृत्य असे म्हणतात.मातीच्या भांड्यात छोटी मशाल करून ते नाचविले जाते .यावेळी कुलदेवताच्या नावाने जयजयकार केला जातो.
    yatra

    No comments:

    Post a Comment