• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    दुधना नदी

    दुधना नदी.


                                            दुधना नदी
                    मराठवाडयातून वाहणाज्या पूर्णेची प्रमुख उपनदी लांबी सु. 177 किमी. पैकी 96 किमी. औरंगाबाद जिल्हयातून तर बाकीचा प्रवाह परभणी जिल्हयातून वाहतो. औरंगाबाद जिल्हयातील खुल्दाबाद-म्हैसमाळ-सारोळा या अर्धवर्तूळाकार डोंगरामध्ये उगम पावून पूर्वेकडे परभणी जिल्हयात वाहत जाते. आणि परभणी शहराच्या ईशान्येस सु. 15 किमी. वर पूर्णानदीला मिळते. उगमापासून 60 किमी. च्या पुढीलनदीचे पात्र रुंद होत जाते. आणि ती बारमाही वाहते. दूधनेच्या उत्तरेकडील जितूर डोंगररांगामुळे पूर्णेचे पाणलोट क्षेत्र अलग झाले. आहे. ज्वारी, बाजरी, गहु, कडधान्ये तुर, मूग, उडीद, वाटाणा, हरभरा, भूईमंूग कापूस ही या नदीखोज्यातील मुख्य पीके होत जालना, रांजणी, परतूर, सैलू, मानवथ, परभणी, ही या नदीखोज्यातील शहरे व बाजारपेठा आहेत. नदीवर काही मध्यम प्रतीचे पाटबंधारे बांधलेले आहेत. 

    No comments:

    Post a Comment