• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत गजानन महाराज

    संत गजानन महाराजांचा पूर्वइतिहास पूर्णतया ज्ञात नाही.त्यांच्या जन्मतारखेबद्दल वादविवाद आहेत.श्री गजानन महाराज हे विदेही,दिगंबर वृत्तीचे आणि सिद्धकोटीला पोहचलेले संत होते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते.शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते.सन १८७८ च्या सुमारास ते वऱ्हाडातील शेगाव नावाच्या एका लहानशा गावात प्रगटले त्या वेळी ते देवीदास पातुरकर महाराजांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते.संत गजानन महाराजांच्या डोळ्यातील तेज पाहून बंकटलालांना खात्री पटली की हा एक महान आणि असामान्य असा योगी आहे.जवळपास ३२ वर्षे श्री गजानन महाराजांचे वास्तव्य शेगाव व परिसरात होते.अशा असामान्य योगीने ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली.

     
    "गण गण गणात बोते" हा संत गजानन महाराजांचा आवडता मंत्र होता.सतत या मंत्राचा जप करत असल्यामुळे गजानन महाराजांना 'गिणगिणे बुवा','गजानन महाराज' अशी नावे पडली.

    उंच सडसडीत शरीरयष्टी,तांबूस वर्ण,तुरळक दाढी व केस,गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी गजानन महाराजांची देहचर्या होती.महाराज लांब लांब पावले टाकीत चालत,त्यामुळे त्यांच्या भक्तगणांना त्यांच्याबरोबर चालताना धावावयास लागे. झुणका भाकरी,मुळ्याच्या शेंगा,हिरव्या मिरच्या व पिठीसाखर हे महाराजांचे आवडते अन्न होते.महाराज लगबगीने एखाद्याच्या घरात जात आणि अंगणात ओसरीवर मुक्कामास रहात ,त्याच्या घरात मिळणारा भाकरतुकडा खाऊन ते पुढील मुक्कामी जात.
       
    Saint_Gajanan_Maharaj    


    गजानन महाराज हे महान योगी पुरुष होते .दांभिकतेचा त्यांना तिटकारा होता .ढोंगी लोक त्यांना आवडत नसत .गजानन महाराज ब्रह्मज्ञानी होते,बहुतेक वेळा ते दिंगबर अवस्थेत असत.मनात आले तर ते अंगावर शाल वापरत.कधीकधी महाराज चिलिम ओढत.अशा महान संताने ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली.समाधी घेण्यापुर्वी महाराजांनी भक्तांना पुढीलप्रमाणे संदेश दिला आणि भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे.


    मी गेलो ऐसे मानू नका |भक्तित अंतर करु नका |
     
    कदा मजलागी विसरु नका |मी आहे येथेच ||
     
    दु:ख न करावे यत्किंचित |आम्ही आहोत येथेच |
     
    तुम्हा सांभाळण्यापरी सत्य |तुमचा विसर पडणे नसे ||
     

     Gajanan1   


    गजानन महाराजांचे फार कमी अभंग उपलब्ध आहेत.दासगणू महाराज व परमपूज्य श्री कलावतीदेवी यांनी महाराजांबद्दल बरेच अभंग लिहिले आहेत.श्री कलावतीदेवी यांनी त्यांच्या 'गुरूस्तुती' मध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे.
    अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा |
     
    अगा! निर्मला, केवला आनंदकंदा ||
     
    स्थिरचररुपी नटसी जगी या |
     
    नमस्कार माझा तुला गुरुराया ||१||

    अगा! अलक्षा, अनामा, अरुपा |

    अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा ||

    कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या |

    नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||

    दासगणू महाराजांनी गजानन महाराजां बद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे.

    मना समजे नित्य|

    जीव हा ब्रह्मास सत्य|

    मानू नको तयाप्रत|

    निराळा त्या तोची असे||

    कोण हा कोठीचा काहीच कळेना |

    ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे |

    साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति |

    आलीसे प्रचिती बहुतांना ||

    गजाननमहाराजांनी खुप चमत्कार केले ,तरीही ते बुवाबाजी आणि ढोंगीपणापासून दूर राहिले.

    No comments:

    Post a Comment