• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत एकनाथ

    संत एकनाथांचा जन्म ,संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी,इ.स.१५३३ मध्ये पैठण येथे झाला.त्यांच्या जन्माच्या सालावरून इतिहासकारात मतभेद आहेत.संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी होते.दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नसल्याने त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजोबांनी केले.दत्तोपासक असलेले जनार्दन स्वामी यांना नाथांनी आपले गुरू मानले होते.'एका जनार्दन'म्हणून एकनाथ स्वत:चा उल्लेख करत.संत एकनाथांनी अभंग,भारूडातून समाजातील विषमतेवर प्रहार केला.बये दार उघड’असे म्हणत त्यांनी समाजात जनजागृती केली.
         
    संत एकनाथांनी भावार्थ रामायण, 'एकनाथी भागवत', 'रुक्मिणीस्वयंवर' , हजारो अभंग, भारूडे व गवळणी लिहिल्या,तसेच ज्ञानेश्वरीच्या प्रतीचे त्यांनी शुद्धीकरण केले.
      
       Saint_Eknath      


    त्यांच्या 'एकनाथी भागवत’या लोकप्रिय ग्रंथात एकूण १३६७ श्लोक आहेत तर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या आहेत.भावार्थ रामायणात सुमारे ४० हजार ओव्या आहेत. नाथांच्या भागवतात श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला ब्रह्मोपदेश असल्यामुळे याला 'उद्धवगीता' असेंही म्हणतात.

    संत एकनाथांचे काही सुंदर अभंग व भारूडे पुढीलप्रमाणे आहेत.


    अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
    आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
    ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
    प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
    गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे

    देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
    चंदन शीतल झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
    भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
    आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे


    परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी
    सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
    सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
    मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी


    सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
    नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
    घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
     एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा

    दादला नको ग बाई
    बया बया बया !
    काय झालं बया ?

    दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई !
    ( अग पर असं का ? )

    मोडकंच घर, तुटकंच छ्प्पर
    ( मग असं ना ! )

    अवं मोडकंच घर अन्‌ तुटकंच छ्प्पर
    ( मग -हा की त्यात ! )

    अवं पन -हायाला घरंच नाही
    मला दादला नको ग बाई !

    फटकंच लुगडं तुटकीच चोळी
    ( अग ती तरी कुठं मिळती ? )

    अवं फाटकंच लुगडं अन्‌ तुटकीच चोळी
    ( मग शिऊन घे की )

    पण शिवायला दोरा न्हाई
    मला दादला नको ग बाई !

    कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
    ( अग ती तर लई ग्वाड वाटती )

    अवं कळण्याची भाकर अन्‌ नुसतीच अंबाड्याची भाजी
    ( मग काय झालं त्यात )

    वर तेलाची धारच न्हाई
    मला दादला नको ग बाई !

    एका जनार्दनी समरस झाले
    ( अग झालीस न समरस )

    पण तो रस येथे न्हाई
    मला दादला नको ग बाई !

    नगं, नगं, नगं !
    का ग बाई, का ग बाई, का ग बाई ?


    विंचू चावला
    सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
    आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार

    अग, ग ..... विंचू चावला
    देवा रे देवा ..... विंचू चावला
    आता काय मी करू ..... विंचू चावला
    अग, ग ..... विंचू चावला
    अग बया, बया ..... विंचू चावला

    अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
    महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?

    काम, क्रोध विंचू चावला
    तम घाम अंगासी आला
    त्याने माझा प्राण चालिला

    मनुष्य इंगळी अति दारुण
    ((हा, हा, म्हणजे अति ’दारू’ नं)
    दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
    दारूण म्हणजे भयंकर.
    (भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)
    अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
    (अति भयंकर म्हणजे ?)
    खूप भयंकर.
    (अन्‌ खूप भयंकर म्हणजे ?)
    मायंदाळ भयंकर.
    (अन्‌ मायंदाळ भयंकर म्हणजे ?)
    तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
    (बापरे !))

    मनुष्य इंगळी अति दारूण
    मज नांगा मारिला तिनं .....

    ((तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
    गंगीचा इथे काय संबंध ?
    (मग त्या रंगीनं.)
    कुणाचाही संबंध नाही.)

    तिनं म्हणजे त्या इंगळीनं
    (महाराज इंगळी म्हणजे ?) ..... मोठा विंचू !
    (अंगाने केवढा ?) ..... तुझ्याएवढा !

    मनुष्य इंगळी अति दारूण
    मज नांगा मारिला तिनं
    सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची

    या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
    (तंबाखु खाणं मागे सारा)
    नाही, नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

    तमोगुण म्हणजे काय ?
    गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
    पिन लावून थोडीशी हवा कमी करा

    सत्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

    सत्य उतारा येऊन (आला का ?)
    अवघा सारिला तमोगुण
    किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने

    पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)
    श्री ज्ञानदेव (तुकाराम)
    पंढरीनाथ महाराज की जय

    रुपे सुंदर सावळा गे माये
    रुपे सुंदर सावळा गे माये
    वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥

    रुणझुण वाजवी वेणु
    वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥

    गोधने चारी हती घेऊन काठी
    वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी
    वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥

    एका जनार्दनी भुलवी गौळणी
    करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

    माझ्या मना लागो छंद
    माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

    तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
    नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

    तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
    निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

    गोविंद हा जनी-वनी ।
    म्हणे एका जनार्दनी ॥४॥

    माझे माहेर पंढरी
    माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
     
    बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
     
    पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
     
    माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा ॥४॥
     
    एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण ॥५॥


    No comments:

    Post a Comment