• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत साईबाबा

    संत साईबाबांचा जन्म २९ सप्टेंबर १८३८ रोजी झाला .श्री साईबाबा शिर्डीत जवळ जवळ ६० वर्षे वास्तव्यास होते.साई बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला.'सबका मालीक एक' हे साईबाबांचे बोल होते.१५ ऑक्टोबर १९१८ साली दसऱ्याच्या दिवशी आपले अवतारकार्य पूर्ण करून साई शिर्डी येथे समाधीस्थ झाले.श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली शिर्डी ही पुण्यभूमी सर्व जाती-धर्मातील लोकांचे श्रध्दास्थान आहे.
     
         
    साई बाबांनी लोकांना दिलेले संदेश पुढीलप्रमाणे आहेत.
    !!सबका मालिक एक.!!
     
    !!श्रद्धा आणि सबूरी.!!
     
    !!मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.!!
     
    !!जातिभेद विसरून प्रेमाने रहा.!!
     
    !!गरीब आणि असहाय लोकांची मदत ही सर्वात मोठी पुजा आहे.!!

    !!आई-वडील, वयस्कर लोक आणि गुरूजन यांचा आदर करा.!!
        
            SaiBaba   



    श्री साईबाबांची अकरा वचने पुढीलप्रमाणे आहेत.
    शिरडीस ज्याचे लागतील पाय ।
    टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥

    माझ्या समाधीची पायरी चढेल ।
    दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥

    जरी हे शरीर गेलो मी टाकून ।
    तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥

    नवसास माझी पावेल समाधी ।
    धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥

    नित्य मी जिवंत,जाणा हेंची सत्य ।
    नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥

    शरण मज आला आणि वाया गेला ।
    दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥

    जो जो,मज भजे,जैसा जैसा भावे ।
    तैसा तैसा पावे,मीही त्यासी ॥ ७ ॥

    तुमचा मी भार वाहीन सर्वथा ।
    नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥

    जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस ।
    मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥

    माझा जो जाहला कायावाचामनीं ।
    तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥

    साई म्हणे तोची तोची झाला धन्य ।
    झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥

    साईबाबांनी खूप चमत्कार केले,पण ते नेहमीच ढोंगी आणि दांभिकपणापासून दूर राहिले.त्यांचे जीवन अगदी साधे होते ,ते फकीराचे जीवन जगले.भक्तांच्या हाकेला नेहमीच साईबाबा धावून जातात.आजही कित्येक भक्तांना साईबाबांच्या चमत्काराची प्रचीती येते. दासगणु महाराजांनी साईबाबांच्या बद्दल खूप अभंग लिहिले आहेत.पुढील अभंगात त्यांनी शिर्डी क्षेत्राचा महिमा वर्णिलेला आहे.

    शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा
    ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें
    कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं
    गणु म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें

    कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनिं जो वाटेल तोचि घ्यावा
    तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकची हो
    भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे
    गणु म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें

    तु माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा
    होई कृपावंत तू शुद्ध गौतमी मी एक ओहोळ मशीं देई स्थळ पायापाशीं
    मशी देई स्थळ तू साच कस्तुरी माति मी निर्धारी मला धरणें दूरीं नाही बरे
    मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे
    पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान

    श्री साईबाबांची आरती पुढीलप्रमाणे आहे.
    आरती साईबाबा ।
    सौख्यदातारा जीवा ।
    चरणरजतळीं निज दासां विसावां ।
    भक्तां विसावा ॥धृ॥

    जाळुनियां अनंग ।
    स्वस्वरुपी राहे दंग ।
    मुमुक्षुजना दावी ।
    निजडोळां श्रीरंग ॥१॥

    जया मनीं जैसा भाव ।
    तया तैसा अनुभव ।
    दाविसी दयाघना ।
    ऐसी ही तुझी माव ॥२॥

    तुमचें नाम ध्यातां ।
    हरे संसृतिव्यथा ।
    अगाध तव करणी ।
    मार्ग दाविसी अनाथा ॥३॥

    कलियुगीं अवतार ।
    सगुणब्रह्म साचार ।
    अवतीर्ण झालासे ।
    स्वामी दत्त दिगंबर ॥४॥

    आठा दिवसां गुरुवारी ।
    भक्त करिती वारी ।
    प्रभुपद पहावया ।
    भवभय निवारी ॥५॥

    माझा निजद्रव्य ठेवा ।
    तव चरणसेवा ।
    मागणें हेंचि आता ।
    तुम्हा देवाधिदेवा ॥६॥

    इच्छित दीन चातक ।
    निर्मळ तोय निजसुख ।
    पाजावें माधवा या ।
    सांभाळ आपुली भाक ॥७॥

    No comments:

    Post a Comment