• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री सप्तशृंगी,वणी



    देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी वणीची,श्री सप्तशृंगीदेवी हे अर्धे पीठ आहे.सप्तश्रृंगगडावर देवीचे भव्य असे मंदिर आहे.देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे.शुंभनिशुंभ व महिषासुर या असुरांचा नाश केल्यानंतर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते.

    पुराणकालातील विविध धर्मग्रंथात देवीचे वर्णन आढळते.श्री सप्तशृंगीदेवीस महाकाली,महालक्ष्मी व महासरस्वती चे ओंकाररूप मानले जाते.सप्तश्रृंगगडावर देवीच्या मंदिरासोबत अनेक प्राचीन मंदिरे आहेत.

    गडावर विविध उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात.देवीची मूर्ती आठ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे.नाकात नथ,कर्णफुले, मंगळसुत्र,कमरपट्टा,तोडे परिधान केलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचे रूप खूपच मनमोहक दिसते.
    श्री सप्तशृंगीदेवी,वणी

    No comments:

    Post a Comment