• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    श्री महालक्ष्मी,कोल्हापूर



    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।

    शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

    देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी हे पुर्ण पीठ आहे.श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम प्राचीन असून चालुक्य,कदंब आणि शिलाहार राजांच्या राजवटीत झालेले आहे.मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीचे आहे.श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती दगडी चौथऱ्यावर उभी आहे.

    मंदिराचा गरूड मंडप अलिकडच्या कालावधीत बांधण्यात आला आहे.मंदिर पश्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.मंदिराच्या आवारात वेगवेगळे शिलालेख आढळतात.मंदिराच्या सभोवती विविध देवतांची मंदिरे आहेत.मंदिराचे शिल्पकाम व मंदिर परिसरात असणारी दीपगृहे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

    देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की,सुर्याच्या उत्तरायन आणि दक्षिणायन वेळी कार्तिक आणि माघ महिन्यात(तारीख ९,१० व ११ नोव्हेंबर,३१ जानेवारी तसेच १ व २ फेब्रुवारी)रोजी सूर्यकिरणे देवीच्या मुर्तीवर पडतात.सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यातील श्री महालक्ष्मीच्या मुर्तीच्या पायावर पडतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात.हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात.
    कार्तिक आणि माघ महिन्यात श्री महालक्ष्मीच्या मुर्तीवर होणारा किरणोत्सव
     

    No comments:

    Post a Comment