• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    नावजी बलकवडे



    छत्रपती शंभूराजेंच्या मृत्युनंतर औरंगजेबाने मराठ्यांवर जोरदार आक्रमण करून,मराठ्यांच्या ताब्यातील किल्ले घेण्याचा सपाटा चालविला होता.छत्रपती राजाराम याच सुमारास जिंजी किल्ल्यावर होते.राजगड,तोरणा,सिंहगड,पुरंदर असे बलाढ्य किल्ले मोघलांच्या ताब्यात आले होते.त्यामुळे मराठी फौजेची महाराष्ट्रातील हालचाल मंदावली होती.

    हा किल्ला परत स्वराज्यात आणण्याची जबाबदारी राजाराम महाराजांनी नावजी लखमाजी बलकवडे यांच्यावर सोपविली सोबत मदतीला विठ्ठल कारकेंना धाडिले.२५ जून १६९३ रोजी राजमाची किल्यावरून त्यांनी मोहिमेला सुरूवात केली. सोबतीला दोर,शिड्या घेऊन मराठी मावळे सिंहगडाच्या पायी आले.वीस वर्षापुर्वीच्या तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे,घाबरलेल्या औरंगजेबाने चारी बाजूला सक्त पहारे लावले होते.त्यामुळे गडावर जाण्यासाठी सर्व मार्ग बंद झाले होते.

    सुर्योदयानंतर गडावर नवे पहारेकरी गस्तीसाठी आले.या लवचिक संधीचा फायदा घेऊन नावजींनी तटाला शिड्या लावल्या व मराठे सैन्य गडावर घुसले.सकाळचे दाट धुके मराठ्यांच्या मदतीस धावून आले,मराठ्यांनी गस्तीवरील सैन्यांना कापून काढले.थोड्याच वेळानी विठ्ठल कारके सुध्दा शिड्या लावून गडावर पोहचले.गडावर गलका उडाला,"गनिम आया,भागो,भागो".पण प्रत्येक मराठी सैनिकात तानाजी मालुसरे संचारले होते.अखेरीस मराठ्यांची सरशी झाली व सिंहगड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.

    नावजी बलकवडे व विठ्ठल कारकेंच्या पराक्रमास खरोखरच तोड नव्हती,धन्य ते मराठे वीर.........
     

    No comments:

    Post a Comment