• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत तुकाराम

    संत तुकारामांचा जन्म भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३०(इ.स. १६०९ )साली झाला,त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.घरची परिस्थिती श्रीमंतीची असल्यामुळे त्यांचे बालपण मोठया कोडकौतुकात गेले.तुकारामांच्या घरचा परंपरागत व्यवसाय हा सावकारीचा होता.इ.स.१६३१ सालच्या कालखंडामध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात त्यांनी सर्व खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून लोकांना सावकारीच्या पाशातून मुक्त केले.

    संत तुकारान

    मुळचे नाव:तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
    आईचे नाव:कनकाई
    पत्नीचे नाव:आवडाबाई
    जन्मठिकाण:इ.स. १६०९ देहू, महाराष्ट्र
    समाधी,मृत्यु:इ.स. १६५० ,देहू,महाराष्ट्र
    ग्रंथ:तुकारामांची गाथा व हजारो अभंग
    गुरू:चैतन्य महाप्रभू

    तुकोबांच्या परमार्थात त्यांच्या पत्नी आवडाबाईंचा फार मोठा वाटा होता.तुकोबांच्या परमार्थ साधनेत त्यांची सर्व काळजी पत्नी आवडाबाईं घेत.तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीनाथ नामदेवरायांना घेऊन आले व त्यांनी तुकोबांना जगत् उध्दाराकरितां अभंग करण्यास सांगितले.
    नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
    सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥
    माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥
    प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥
    द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥
    आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥
    सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥
    नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥

    संत तुकोबांनी आपल्या अभंगातून विट्ठलाचे गुणवर्णन केले ,तसेच कर्मठपणा, अंधश्रद्धेवर प्रहार केला,खोट्या साधूंवर त्यांनी टीकाही केली .त्यांचे काही  सुंदर अभंग पुढे आहेत.

    जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।

    जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।·
    संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।·
    महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।·
    सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।

    सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ।

    सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ।कर कटावरी ठेवोनिया ॥१॥·
    तुळसी हार गळा, कांसे पितांबर । आवडे निरंतर तेची रूप ॥२॥·
    मकर कुंडले तळपती श्रवणी ।कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥·
    तुका म्हणे माझे हेची सर्व सुख ।पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥

    संत तुकोबांनी,यावर अभंगाच्या सर्व वह्या दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडविल्या.या गोष्टीचे तुकोबांना खुप दुःख झाले व ते महाद्वारात असलेल्या शिळेवर देवासमोर धरणे धरून बसले.
    बुडविल्या वह्या बैसिलो धरणे ॥
    देहूस तेरा दिवस-रात्र तुकोबांराया अन्नपाण्याची फिकीर न करता भगवंताचे अनुष्ठान करित बसले.

    तेरा दिवस झाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥
    तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा॥
    तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुज वरी ॥

    तेरावे रात्री भगवंत बाळाचे रूप घेऊन तुकोबांरायाना भेटले,व म्हणाले की “आपल्या वह्यांचे मी पाण्यांत अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहे. त्या उद्या पाण्यावरती येतील”. देऊ गावाच्या भक्तमंडळीना ही भगवंताने दृष्टांत दिला,इंद्रायणीच्या डोहावर सर्व भक्तगण गेली असता,अभंगाच्या वह्या पाण्यावर तरंगत होत्या.त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता.सर्व भक्तगणानी तुकोबांचा जयजयकार केला,तुकोबांना मात्र,आपण देवाला त्रास दिल्याबद्दल वाईट वाटले.

    थोर अन्याय मी केला ।तुझा अंत म्यां पाहिला॥
    विठ्ठल-रुक्मिणीजनाचिया बोलासाठी ।चित्त क्षोभविले ॥१॥
    उदकी राखीले कागद ।चुकविला जनवाद ।
    तुका म्हणे ब्रीद ।साचे केलें आपुलें ॥

















    एकदा रामेश्वरशास्त्रीना अनगड सिध्द फकीर यांनी शाप दिल्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह झाला होता.या शापातून मुक्त होण्यासाठी रामेश्वरशास्त्री आळंदीस अजान वृक्षाखाली अनुष्ठान करीत बसले असताना ज्ञानदेव महाराजांनी त्यांना तुकारामांना शरण जावयास सांगितले.रामेश्वरशास्त्री देहूला निघाले हे कळताच तुकोबांरायानी आपल्या शिष्याकरवी , रामेश्वरशास्त्री करिता अभंग पाठविला ,तो अभंग वाचताच त्यांचा दाह शांत झाला.

    चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥
    दुःख तें देईल सर्व सुखफळ । होतील शितळ अग्निज्वाळा ॥

    रामेश्वरशास्त्रीनी याविषयी आपला अनुभव सांगितला आहे.

    काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा हे शरीरी बहू झाली ॥
    म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझे ॥
    tukaram1
    रामेश्वरशास्त्री शापमुक्त झाल्याचे कळल्यानंतर अनगड फकीर तुकोबांना त्रास देण्याकरिता देऊस आले.तुकोबांचे घरी जाऊन त्यांनी कटोराभर भिक्षा मागितली.तुकोबांच्या कन्येने चिमुटभर पीठ कटोऱ्यात टाकताच तो पूर्ण भरून पीठ खाली सांडले.अनगड फकीराचे गर्वहरण झाले व ते तुकोबांचे जवळ भजन, कीर्तन ऐकण्याकरिता राहिले.अशा रीतिने तुकोबांचा भजनकिर्तनाचा मार्ग मोकळा झाला.



    संत तुकाराम व छत्रपति शिवराय समकालीन होते.संत तुकारामांची कीर्ती ऐकून छत्रपति शिवरायांनी, तुकोबांरायासाठी घोडे आणि जडजवाहीर पाठविले.त्याचा स्वीकार न करता त्यांनी तो अभंगांचे पत्रासहीत राजांना परत केला.छत्रपतिं ची व तुकोबांरायांची जेव्हा भेट झाली ,तेव्हा तुकोबांराय राजांना म्हणाले.

    नावडे जे चित्ता । ते तू होशी पुरविता ॥१॥
    काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥२ ॥
    तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥३ ॥
    तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥४ ॥
    मुंगी आणि राव । आम्हा समानचि जीव ॥५ ॥
    tukoba_shivaji
    सोने आणी माती । आम्हा समानचि चित्ती ॥२॥
    आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
    म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥२॥
    आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥

    तुकोबांरायानी छत्रपति शिवप्रभूंना क्षात्र धर्म सांगितला आणि राजाचे कर्तव्य पार पाडण्यास सांगितले,वारकरी संप्रदायातील अनेक लोक छत्रपति शिवप्रभूंच्या सैन्यात होते,छत्रपति शिवप्रभूंनी तुकोबांचा उपदेश कृतीत उतरवला व स्वराज्य साकारले.संत तुकारामांचे पाईकीचे अभंग प्रसिध्द आहेत.खऱ्या अर्थाने संत तुकाराम, छत्रपति शिवप्रभूंचे अध्यात्मिक गुरू होते.


    No comments:

    Post a Comment