• ① आॅडीओ(mp3)
  • ②वाचनिय
  • ③वर्णनात्मक नोंदी
  • ④शोध विभाग
  • ⑤संगणक मित्र
  • ⑥शिष्यवृत्ती
  • ज्ञानरचनावाद
  • डाउनलोड
  • भौगोलिक
  • ऐतिहासिक महाराष्ट्र
  • शिक्षक दालन
  • मोबाईल
  • मूल्यमापन
  • ज्ञानप्रकाश ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे. Blogger Tips and Tricks

    संत चोखामेळा

    संत चोखामेळा यांचा जन्म इ.स.१३३८ साली पंढरपूरला झाला.जातीने हरिजन असलेल्या चोखामेळा यांचा धर्ममार्तंडांनी खुप छळ केला.त्यांना मंदिरात यावयास बंदी घातली.'शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा'असे म्हणून ते आपल्या शुद्धत्वाची ग्वाही देऊन,देहभाव नष्ट झाल्याचे सांगतात.संत सोयराबाई या त्यांच्या पत्नी होत.संत चोखामेळाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू होता असे सांगतात.पंढरपुरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे.

       
    भाषेच्या सर्वच प्रकारात त्यांची अभंगरचना चोख असल्यामुळेच त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान आहे.संत चोखामेळ्याचे संपूर्ण कुटुंबच विठ्ठल भक्तीत लीन होते.त्यांची भक्ती पाहून विठ्ठल मंदिरातून चोखामेळ्यास भेटावयास त्याच्या घरी आले.
      
     Chokha_Mela    


    अभंग १.अबीर गुलाल उधळीत रंग
    अबीर गुलाल उधळीत रंग ।
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

    उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
    रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन ।
    पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

    वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
    चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
    विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

    आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
    पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
    चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥

     
    अभंग २. आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

    आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
    वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

    आगमाची आढी निगमाचा भेद ।
    शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

    योग याग तप अष्टांग साधन ।
    नकळेची दान व्रत तप ॥३॥

    चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
    गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

    अभंग ३.जोहार मायबाप जोहार

    जोहार मायबाप जोहार ।
    तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

    बहु भुकेला झालो ।
    तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

    बहु केली आस ।
    तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

    चोखा म्हणे पाटी ।
    आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

    अभंग ४. पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

    पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
    प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

    त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
    दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

    सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
    पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

    चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
    भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

    अभंग ५.विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी

    विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
    अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

    होतो नामाचा गजर ।
    दिंड्या पताकांचा भार ॥२॥

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
    अपार वैष्णव ते जाण ॥३॥

    हरि कीर्तनाची दाटी ।
    तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

    अभंग ६. सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं

    सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं।
    पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

    साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
    भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

    कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
    शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

    चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी ।
    चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

    अभंग ७.सुखाचें हें नाम आवडीनें गावें

    सुखाचें हें नाम आवडीनें गावें।
    वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

    संसार सुखाचा होईल निर्धार
    नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

    कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
    आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥

    आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
    म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥



    No comments:

    Post a Comment